वाढत्या महागाईचा विचार करून आपण दैनंदिन जीवनातील खर्च विचार करून करतो. मोबाईल रिचार्जवर सुद्धा बऱ्याच ऑफर असतात जिओ ही मोबाईल कंपनी त्यांच्या युजर्सना १०० रुपयांमध्ये रिचार्ज सुविधा देत आहे. जिओ कंपनीचा (Jio Mobile recharge) हा ९१ रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये युजर्सला कॉलिंगसह दैनंदिन डेटा या सुविधा दिल्या जातात. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस सारखे फायदे सुद्धा युजर्सला मिळतील. जिओप्रमाणेच Vi आणि एअरटेलचे सुद्धा काही स्वस्त प्लॅन्स आहेत याविषयी माहिती खालीलप्रमाणे…
( हेही वाचा : Post Office Scheme : दररोज फक्त ५० रुपये गुंतवा, ३५ लाखांपर्यंत परतावा मिळवा; जाणून घ्या या सरकारी योजनेविषयी… )
जिओचा (Jio) ९१ रुपये प्लॅन
- जिओच्या ९१ रुपये प्लॅनमध्ये युजर्सला दररोज १००MB डेटा दिला जातो. तसेच डेटा संपल्यास अतिरिक्त २००MB डेटा सुद्धा मिळतो तसेच प्लॅनची वैधता संपेपर्यंत संपूर्ण ३GB डेटा मिळतो.
- या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. यासोबत तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही दिली जाणार आहे. हा प्लॅन फक्त JIO फोनचा वापर करणाऱ्या युजर्ससाठीच लागू असेल.
इतर कंपन्यांचे प्लॅन
- Vodafone Idea च्या ९८ रुपये प्लॅनची वैधता १५ दिवस असून यात २०० MB डेटासह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते.
- तर Airtel च्या ९९ रुपये प्लॅनमध्ये युजर्सला २०० MB डेटा दिला जात आहे याची वैधता २८ दिवस असेल.