JJ Hospital Mumbai : मुंबईतील मोठ्या आणि जुन्या जे. जे. हॉस्पिटलचा रंजक इतिहास

220
JJ Hospital Mumbai : मुंबईतील मोठ्या आणि जुन्या जे. जे. हॉस्पिटलचा रंजक इतिहास

जे. जे. हॉस्पिटल, मुंबईतील ही एक प्रमुख आणि जुनी वैद्यकीय संस्था आहे. या संस्थेला १७५ वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. ही भारतातील पदवीपूर्व आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण देणारी सर्वात जुनी सरकारी वैद्यकीय संस्था आहे. महत्वाचे म्हणजे हे एक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल देखील आहे. (JJ Hospital Mumbai)

कधी झाली स्थापना?

मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल एक सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. हे दक्षिण आशियातील सर्वात जुन्या वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक आहे. ३० मार्च १८४३ रोजी अधिकृतपणे रुग्णालयाची पायाभरणी करण्यात आली आणि पहिल्या आठ विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन ते १८४५ मध्ये अधिकृतपणे सुरु झाले. १८४५ मध्ये मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट यांनी जे.जे. हॉस्पिटलची स्थापना केली होती. (JJ Hospital Mumbai)

रुग्णालयाचे खरे नाव काय होते?

खरंतर या रुग्णालयाचे पूर्वीचे नाव ग्रॅंड मेडिकल कॉलेज असे होते. प्रख्यात समाजसेवक आणि उद्योजक सर जमशेटजी जीजीभॉय यांनी रुग्णालयाच्या स्थापनेसाठी उदार मनाने एक लाख रुपये दिले. त्यांच्या नावावरुनच रुग्णालयाचे नामकरण करण्यात आले. १५ मे १८४५ रोजी ३०० खाटा सज्ज झाल्या आणि जेजे हॉस्पिटलचे दरवाजे रुग्णांसाठी उघडले गेले. (JJ Hospital Mumbai)

(हेही वाचा – UP Crime News: गुपचूप तिसरं लग्न करत होता पती पण, अचानक दोघी मंडपात आल्या अन्…)

या दिवशी दाखल झाला पहिला रुग्ण

पहिला रुग्ण २८ मे १८४५ रोजी दाखल झाला आणि विद्यार्थ्यांची पहिली तुकडी १ नोव्हेंबर १८४५ रोजी ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाली. त्यामुळे या रुग्णालयाचा इतिहास खूपच जुना आणि दैदिप्यमान आहे. आजही हे रुग्णालय प्रमुख रुग्णालयांपैकी एक आहे. (JJ Hospital Mumbai)

महिलांना प्रवेश देणारी वैद्यकीय संस्था 

विशेष म्हणजे १८८३ पासून सुरू झालेले हे रुग्णालय महिला विद्यार्थ्यांना प्रवेश देणारे भारतातील दुसरे वैद्यकीय महाविद्यालय होते. यामुळे महिला देखील वैद्यकीय व्यवसायात कारकीर्द करु शकल्या. भारतामध्ये अनेक क्रांतिकारी बदल झाले, ज्यापैकी हा देखील महत्वाचा बदल मानला जातो. (JJ Hospital Mumbai)

जे.जे. समूह

हे रुग्णालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहे. हा सर जे.जे. रुग्णालयांचा समूह आहे, ज्यामध्ये दक्षिण मुंबईतील चार रुग्णालये आहेत: सर जे.जे. हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल आणि कामा ऍंड अलब्लेस हॉस्पिटल. (JJ Hospital Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.