कोरोनामुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. लॉकडाऊनमुळे जवळपास सर्व उद्योगधंदे ठप्प होते, यामुळे देशात बेरोजगारांच्या आकड्यात वाढ झाली आहे. अमेरिकेमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लाट आली होती, यामुळे आता अमेरिकेत नोकरीचा राजीनामा देण्याचा नवा ट्रेंड आला आहे. याला ‘ग्रेट रेझिन्गेशन’ असे म्हणातात. हाच नवा ट्रेंड आता भारतातही दिसून येत आहे.
( हेही वाचा : ठाकरे सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय! सरळसेवेतील पदं एमपीएससी मार्फत भरणार )
साडेसात कोटी राजीनामे
अमेरिकेत २०२१ मध्ये जवळपास साडेसात कोटी लोकांनी नोकरीचे राजीनामे दिले आहेत. आरोग्य, वाहतूक, वेअरहाऊस या क्षेत्रातील लोकांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. आता भारतातही ‘ग्रेट रेझिन्गेशन’ चा हा नवा ट्रेंड सुरू झालेला आहे. अमेरिकेच्या तुलनेत भारतात नोकरीला सोडचिठ्ठी देण्याचे प्रमाण कमी असले, तरीही चिंताजनक आहे. कमी वेतनामुळे सर्वाधिक भारतीयांनी नोकरीचा राजीनामा दिलेला आहे.
( हेही वाचा : काय सांगताय! आता चंद्रही ‘मेड इन चायना’? )
भारतातही नोकरीचा राजीनामा देण्याची लाट?
भारतातील जवळपास ५१ टक्के लोक अनुभव नसलेल्या क्षेत्रात नोकरी शोधत आहेत. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा, कमी पगार, सहकाऱ्यांशी संबंध, आरोग्याची देखभाल, करिअरमधील मर्यादित संधी, वरिष्ठांकडून कामाची दखल न घेणे यामुळे अनेक भारतीयांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. यामुळे तज्ज्ञांकडून अमेरिकेपाठोपाठ भारतातही नोकरी सोडण्याची लाट येऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community