JSW Energy : जेएसडब्ल्यू एनर्जीला असं मिळालं हे नाव

JSW Energy : जेएसडब्ल्यू समुहाचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया. 

23
JSW Energy : जेएसडब्ल्यू एनर्जीला असं मिळालं हे नाव
  • ऋजुता लुकतुके

हरियाणाच्या हिस्सार इथं १९५२ मध्ये ओम प्रकाश जिंदाल यांनी एक छोटा पोलाद प्रकल्प उभा केला. उद्योजकतेच्या विचारांना भारावलेले ओम प्रकाश कट्टर काँग्रेसी आणि गांधींचे अनुयायी होते. देशाला अवजड उद्योग क्षेत्रात पुढे नेण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. हरियाणाच्या आणि देशाच्या राजकारणातही त्यांना रस होता. त्यामुळे असेल कदाचित पण, त्यांनी विस्ताराचा फारसा विचार सुरुवातीला केला नाही. पण, त्यांचे चारही मुलगे पृथ्वीराज, सज्जन, रतन आणि नवीन घरच्या उद्योगात आले आणि आधी छोटा वाटणारा हा समुह भराभर विस्तारत गेला. (JSW Energy)

१९७० मध्ये समुहाने स्टेनलेस स्टील उत्पादन कंपनी सुरू केली. आणि १९७९ मध्ये जिंदाल स्टील अँड पॉवर कंपनीचीही स्थापना झाली. या दोन कंपन्यांच्या उदयाने अवजड उद्योग क्षेत्रात जिंदालचा ठसा उमटला. कारण, पोलाद उद्योगात सुरू झालेला प्रवास आता खाण उद्योग, ऊर्जा, पोलाद उद्योग आणि पायाभूत सुविधा उद्योगापर्यंत झाला होता. जिंदाल स्टीलचा प्रवास उद्योग समुहात झाला होता. (JSW Energy)

(हेही वाचा – skf india : काय आहे SKF India Ltd आणि काय आहे SKF चा फुल फॉर्म?)

पुढे १९८२ मध्ये जिंदाल स्टील आणि १९८४ मध्ये जिंदाल सॉ कंपनीची स्थापना झाली. जिंदाल स्टीलच्या स्थापनेबरोबरच समुहाचे पोलाद प्रकल्पही विस्तारत गेले आणि तिथेच कंपनीच्या जेएसडब्ल्यू या नावाचा उगम झाला. कारण, कंपनीचा पहिला प्रकल्प हिस्सारमध्ये उभा राहिल्यानंतर त्यांनी कर्नाटकातील बेलारीत सालेम इथं आपला आणखी एक प्रकल्प उभा केला. आणि या प्रकल्पाला नाव दिलं जिंदाल साऊथ. कारण, हा दक्षिणेतील प्रकल्प होता. त्यानंतर महाराष्ट्रातील एक छोटा पोलाद प्रकल्प जिंदाल समुहाने विकत घेतला आणि त्याला नाव दिलं जिंदाल वेस्ट. कारण, देशाच्या पश्चिम विभागातील तो प्रकल्प होता आणि जिंदाल पोलाद उद्योगाला जिंदाल साऊथ वेस्ट असं म्हटलं जाऊ लागलं. (JSW Energy)

पण, जिंदाल समुहाची भूक एवढ्याने भागणार नव्हती आणि अधिकाधिक प्रकल्प त्यांच्या छत्रछायेत येणार होते. अशावेळी जिंदाल समुहाला एका मोठ्या उद्योग समुहाचं रुप आलं. जिंदाल साऊथ वेस्टचं झालं जेएसडब्लयू. उद्योग समुह म्हणून तो याच नावाने नावारुपाला आला. या समुहातील पहिली ऊर्जा कंपनी म्हणजे जेएसडब्ल्यू एनर्जी. १९९४ मध्ये स्थापन झालेली आणि ६७,०२४ कोटी रुपये भाग भांडवल असलेली ही कंपनी आहे. या प्रकल्पातून तब्बल ७,७६६ मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती होते. यात औष्णिक, जलविद्युत तसंच पवन ऊर्जेचाही समावेश आहे. तर बदलत्या काळानुरुप आता सौरऊर्जा प्रकल्पातूनही ६६७ मेगावॅट इतकी वीज निर्मिती होत आहे. आगामी काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांकडे वळण्याचा कंपनीचा विचार आहे. सज्जन जिंदाल या कंपनीचे अध्यक्ष आहेत. (JSW Energy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.