Jyoti Structure Share Price : ज्योती स्ट्रक्चर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची वाटचाल कशी आहे?

Jyoti Structure Share Price : ऊर्जा क्षेत्राला पायाभूत सुविधा पुरवणारी ही कंपनी आहे.

23
Jyoti Structure Share Price : ज्योती स्ट्रक्चर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची वाटचाल कशी आहे?
  • ऋजुता लुकतुके

ज्योती स्ट्रक्चर्स लिमिटेड ही पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रातील एक स्मॉलकॅप कंपनी आहे. १९७४ मध्ये कंपनीची स्थापना झाल्यापासून ऊर्जा क्षेत्रातील अतीउच्च दाबाची ऊर्जा वाहून नेणाऱ्या विद्युत तारांचं जाळं ही कंपनी उभारते. तसंच विद्युत उपकेंद्र उभारते आणि ती चालवतेही. हे विशेष श्रेणीचं काम आहे. आतापर्यंत भारतीय खेड्यांमध्येही कंपनीने सेवा दिली आहे. तर आता कंपनीने निर्यात म्हणजे परदेशात आपले प्रकल्प उभारण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. (Jyoti Structure Share Price)

अमेरिकेसह उत्तर व दक्षिण अमेरिका, उत्तर आफ्रिका, भारत, चीन दक्षिण आशिया व ऑस्ट्रेलिया अशा जवळ जवळ सर्व खंडात कंपनीचा संचार म्हणजे प्रकल्प आहेत. तर देशातील राज्य सरकारच्या मालकीच्या वीज वितरण कंपन्यांबरोबरच खाजगी वीज कंपन्याही ज्योती स्ट्रक्चर्सचं जाळं वापरतात. हा शेअर मात्र अजूनही स्मॉलकॅप आहे आणि कंपनीवर असलेल्या मोठ्या कर्जामुळे कंपनीचा ताळेबंदही लाल रंगात आहे. मागच्या सहा महिन्यात या शेअरमध्ये तब्बल ४१ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर या आठवड्याचा आढावा घेतला तर यात साडेतीन टक्क्यांची म्हणजेच ५० शतांश अंशांची वाढ झाली आहे. (Jyoti Structure Share Price)

(हेही वाचा – ज्येष्ठ वकील विष्णू शंकर जैन Waqf Act 1995 ला देणार आव्हान; मागील ७० वर्षांत वक्फ बोर्डाने हडपलेल्या जमिनीही उघडकीस येणार?)

New Project 2025 04 12T185348.593

कंपनीला मुख्य फटका बसलाय तो कंपनीवरील कर्जाचाच. त्यामुळे कंपनीचं डेब्ट टू इक्विटी गुणोत्तर १५.९ इतकं मोठं आहे. या कंपनीचे विक्रीचे आकडे वर्षभरात ५८ टक्क्यांनी वाढले असले तरी ऑपरेशनल नफा हा शून्य टक्के आहे. मागच्या पाच वर्षांत कंपनीचा नफा हा वाढलेला नाही. फेब्रुवारी २०२५ पासून या शेअरमध्ये विक्रीचा जोर दिसत असून एकूण ३२ टक्क्यांची घसरण झाली आहे. शिवाय ऊर्जा क्षेत्रातील इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांची शेअर बाजारातील कामगिरी पाहता, हा शेअर तसा लोकांचं लक्ष वेधून घेण्यात कमीच पडला आहे. (Jyoti Structure Share Price)

कंपनीचा निव्वळ नफा मात्र यंदाही ८५ टक्क्यांचा आहे. पण, ऑपरेशनल नफा अजूनही वाढताना दिसत नाही. याचा फटका कंपनीला बसतो आहे. या शेअरमध्ये संस्थागत गुंतवणूकदारांनी आतापर्यंत फक्त २.९ टक्के इतकी गुंतवणूक केली आहे. त्यातही अलीकडच्या काळात जास्त घट झाली आहे. (Jyoti Structure Share Price)

(डिस्क्लेमर : शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर ही गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी आणि विक्रीवर कुठलाही सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.