Kali Gandaki River Nepal : अयोध्येतील रामलल्लाचे आणि नेपाळमध्ये वाहणार्‍या काली गंडकी नदीचा आहे खास संबंध!

काली गंडकी नदी ही रहस्यमय आहे. कारण या नदीमध्ये सापडणारे दगड हे साधारण दगड नसून प्रत्यक्ष शाळीग्राम शिला आहेत.

83
Kali Gandaki River Nepal : अयोध्येतील रामलल्लाचे आणि नेपाळमध्ये वाहणार्‍या काली गंडकी नदीचा आहे खास संबंध!

काली गंडकी नदी ही नेपाळमधल्या प्रमुख नद्यांपैकी एक आहे. तसंच ही नदी भारतातल्या गंगा नदीच्या डाव्या बाजूची उपनदी आहे. या नदीला नारायणी किंवा गंडक म्हणूनही ओळखलं जातं. (Kali Gandaki River Nepal)

काली गंडकी नदीचा विस्तार :

या काली गंडकी नदीचं पात्र ४६,३०० किलोमीटर इतकं आहे. नदीचा बहुतांश प्रवाह नेपाळमध्ये वाहतो. नेपाळच्या हिमालय पर्वतरांगांमध्ये काली गंडकी नदी खोल दऱ्यांतून वाहते. या नदीच्या खोऱ्यात ८,००० मीटर म्हणजेच २६,००० फूटांपेक्षा जास्त उंचीचे तीन पर्वत आहेत. धौलागिरी, मनास्लू आणि अन्नपूर्णा मासिफ्स अशी या पर्वतांची नावं आहेत. त्यांपैकी धौलागिरी पर्वत शिखर हे काली गंडकी नदीच्या खोऱ्यातलं सर्वात उंच शिखर आहे. (Kali Gandaki River Nepal)

काली गंडकी नदीचं महत्त्व :

ही नदी रहस्यमय आहे. कारण या नदीमध्ये सापडणारे दगड हे साधारण दगड नसून प्रत्यक्ष शाळीग्राम शिला आहेत. ही नदी हिमालयातून उगम पावते. पुढे दक्षिण-पश्चिम नेपाळमधून वाहते आणि भारतातल्या बिहार तसंच उत्तर प्रदेशात प्रवेश करते आणि पाटणाजवळ गंगा नदीला येऊन मिळते. या पवित्र नदीच्या गर्भात जिवंत शाळीग्राम आढळतात. या दगडाला विष्णूचं खरं रूप मानलं जातं. अयोध्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली श्रीराम लल्लाची मूर्ती याच नदीच्या शाळीग्राम शिळेपासून तयार केलेली आहे. त्यामुळे या नदीचे आणि रामल्लाचे खास संबंध आहे असेच म्हणावे लागेल. (Kali Gandaki River Nepal)

(हेही वाचा – Budget Session 2024: पुणे अपघात प्रकरणावरुन विरोधक आक्रमक; फडणवीसांनी विधिमंडळात दिली धक्कादायक माहिती!)

जलविद्युत प्रकल्प : 

या नदीवर नेपाळचा सर्वांत मोठा जलविद्युत प्रकल्प उभारलेला आहे. (Kali Gandaki River Nepal)

काली गंडकीचं उगमस्थान आणि तिची वेगवेगळी नावं : 

काली गंडकी नदीचा उगम तिबेटच्या सीमेवर नेपाळच्या मुस्तांग प्रदेशातल्या हिमालयातल्या नुबिन ग्लेशियरमधून ६,२६८ मीटर म्हणजेच २०,५६४ फूटांच्या उंचीवरून झाला आहे. नदीच्या मुख्य प्रवाहाचं नाव छुआमा खोला असं आहे. त्यानंतर नदी लो मंथांग, निचुंग खोला किंवा चोरो खोला या नावांनी ओळखली जाते. (Kali Gandaki River Nepal)

पुढे ही नदी दक्षिण-पश्चिम भागात मस्तंग खोला या नावाने ओळखली जाते. चेले येथे एका स्टील फूटब्रिजवर नदी रुंद होते. तिथे तिच्या प्रवाहाचा एक भाग बोगद्यातून वाहतो. या ठिकाणाहूनच या नदीला सगळीकडे काली गंडकी असं म्हणतात. (Kali Gandaki River Nepal)

हिमालयापेक्षा जुनी नदी :

ही नदी हिमालयापेक्षाही जुनी आहे असं म्हटलं जातं. दक्षिणेला ही नदी गाळेश्वर येथे राहुघाट खोला, बेणी येथल्या म्यागडी खोला, कुष्माजवळच्या मोदी खोला आणि रिडी बाजाराच्या वर रुद्राबेणी येथे बडीगड या नद्यांना मिळते. त्यानंतर ही नदी पूर्वेकडे वळते आणि महाभारत पर्वत श्रेणींच्या उत्तरेकडून वाहते. (Kali Gandaki River Nepal)

मग पुन्हा दक्षिणेकडे वळून महाभारत पर्वतरांगांतून देवघाट येथे येते. या ठिकाणी काली गंडकी नदीची एक त्रिशूली नावाची प्रमुख उपनदी आहे तिला जाऊन मिळते. ही नदी काली गंडकीपेक्षा मोठी आहे. काली गंडकी पुढे पूर्वेकडच्या राप्ती नदीला जाऊन मिळते. ही नदी चितवन नावाच्या आतल्या भागात तराई खोऱ्यातून वाहते. मग पुढे काली गंडकी हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरच्या पायथ्याशी असलेल्या शिवालिक टेकड्या ओलांडून नेपाळच्या तराई मैदानात प्रवेश करते. (Kali Gandaki River Nepal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.