kalpa himachal : कल्प हिमाचलमध्ये गेल्यावर काय काय पाहाल? सौंदर्याने नटलेलं आहे हे गाव!

135
kalpa himachal : कल्प हिमाचलमध्ये गेल्यावर काय काय पाहाल? सौंदर्याने नटलेलं आहे हे गाव!

कल्प (kalpa himachal) हे भारतातल्या हिमाचल प्रदेशातलं किन्नौर जिल्ह्यातलं रेकाँग पिओच्या वर असलेलं एक छोटंसं गाव आहे. हे गाव सतलज नदीच्या खोऱ्यात वसलेलं आहे. किनौर या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना किन्नौरी असं म्हटलं जातं. हे गाव प्रामुख्याने सफरचंदाच्या बागांसाठी ओळखलं जातं. सफरचंद हे हिमाचल प्रदेशाचं प्रमुख नगदी पीक आहे. इथले स्थानिक किन्नौरी लोक हिंदू आणि बौद्ध धर्माच्या परंपरा आणि रुढींचं अनुसरण करतात. कल्प इथली अनेक मंदिरं हिंदू आणि बौद्ध या दोन्ही धर्मांना समर्पित आहेत. भारतातले पहिले मतदार श्याम सरन नेगी हे कल्प या गावचेच आहेत.

कल्प (kalpa himachal) हे प्राचीन मंदिरांचा मोठा इतिहास असलेलं गाव आहे. या गावच्या खालच्या बाजूला खोल दरीतून सतलज नदी वाहते. या गावात जाण्यासाठी वळणावळणाचा डोंगरी रस्ता आहे. हा रस्ता चिलगोजा जंगलांनी वेढलेला आहे. या गावचं वातावरण अतिशय शांत आहे. हल्लीपर्यंत या शांत वस्तीला परदेशी पर्यटक भेट देत नव्हते. पण सध्याच्या काळात इथे पर्यटक यायला लागले आहेत. तरीसुद्धा त्या मानाने फार कमी पर्यटक इथे येतात.

(हेही वाचा – लैंगिक अत्याचार पीडितांची वैद्यकीय तपासणी केवळ महिला डॉक्टरांनीच करावी; Karnataka High Court चा निर्णय)

आता कल्प या गावामध्ये राहण्यासाठी पाच पेक्षा जास्त ठिकाणं आहेत. तसंच रेकाँग पिओ येथे खालच्या बाजूला आणखी ठिकाणं आहेत. या ठिकाणी पर्यटकांच्या राहण्याची सोय होऊ शकते. प्रवाशांना स्पीती व्हॅलीकडे जाण्यासाठी परवानगी घेऊन पुढे जावं लागतं. कारण स्पीती व्हॅली हा तिबेटचा पूर्वेकडचा एक छोटासा भाग आहे. येथून कैलास पर्वतावर वसलेला पवित्र शिवलिंग खडक पाहायला मिळतो. या शिवलिंग खडकावर दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमध्ये वेगवेगळ्या रंगछटा आपल्याला पाहायला मिळतात.

  • रेकाँग पिओ

रेकाँग पिओ हे किन्नौर जिल्ह्याचे मुख्य शहर आहे. हे शहर शिमलापासून २६० किलोमीटर, पौडीपासून ७ किलोमीटर आणि कल्प या गावापासून ८ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.

  • कोठी मंदिर

रेकाँग पिओपासून फक्त ३ किलोमीटर एवढ्या अंतरावर असलेल्या एका कोठीमध्ये चंडिका देवीचं मंदिर आहे. या मंदिराची वास्तुशिल्प शैली आणि उत्कृष्ट शिल्पकला ही देवदाराच्या पर्वत आणि उपवनांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची सोन्याची उत्कृष्ठ प्रतिमा कोरलेली आहे.

(हेही वाचा – manali airport : मनाली विमानतळावर घ्या या सुविधांचा लाभ आणि घ्या अशी काळजी)

  • चका मेडोस

या ठिकाणी पोहोचण्यासाठी तीन ते चार किलोमीटर एवढी सोपी चढाई करावी लागते. त्यासाठी कल्पा-रोघी या रस्त्यावरच्या एका पॉईंटपासून पायवाट सुरू होते. चका मेडोज हे ठिकाण सुमारे ३८०० मीटर उंचीवर वसलेलं आहे. या ठिकाणाहून किन्नौर कैलास पर्वतराजींचं सुंदर मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळतं.

  • रोल्ला डोखंग

कल्प-रोघी रस्त्यावर म्हणजेच चिनी मार्केटपासून सुमारे ३ किलोमीटर एवढ्या अंतरावर हा एक सेल्फी पॉइंट आहे. या खडकाळ क्षेत्रातून किन्नौर कैलास पर्वतराजी, सतलज नदीचा घाट आणि रोघी, तसंच मेबर आणि रल्ली गावाची काही मनमोहक आणि नयनरम्य दृश्यं दिसतात. (kalpa himachal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.