‘करण जोहर चित्रपट माफियांमधील मुख्य आरोपी’

120

करण जोहर हा चित्रपट माफियांमधील मुख्य आरोपी आहे असल्याचा आरोप बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत कंगनाने हे ट्वीट केले आहे.

काय म्हणाली कंगना

करण जोहर हा चित्रपट माफियांमधील मुख्य आरोपी आहे, एवढेच नाही तर अनेक लोकांचे जीवन बरबाद करुन तो खुलेआम फिरत आहे, त्याच्यावर कारवाई केली जात नाही. आम्ही काही अपेक्षा करु शकतो का? सगळे मिटल्यावर तो आणि त्याची गॅंग माझ्याकडेही येईल”, असे कंगनाने म्हटले आहे. तसेच करण जोहरची गँग माझ्याविरोधात षडयंत्र करत असल्याचे देखील तिने म्हटले होते. आधीदेखील कंगना राणौतने करण जोहरवर घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला होता. करण जोहर फक्त स्टार किड्सला प्रोत्साहन देतो त्यांना चित्रपटात काम देत असल्याचे तिने म्हटले होते.

कंगनाला वाटते मुंबई पोलिसांची भीती

दरम्यान कंगनाने मुंबई पोलिसांवर देखील आरोप केला आहे. भाजप प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांच्या ट्वीटला उत्तर देताना कंगनाने आपल्याला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असे ट्वीट केले होते. ‘मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या, पण मुंबई पोलिसांकडून नको.’ असे म्हणत तिने मुंबई पोलिसांवर अविश्वास जाहीरपणे व्यक्त केला होता. यावर ड्रग्जशी संबंधितांची नावे सांगणाऱ्या कंगनाला महाराष्ट्र सरकार सुरक्षा का देत नाही? असा सवाल भाजपा नेते राम कदम यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.