kanha national park : वाघ बघायचा आहे का? मग कान्हा राष्ट्रीय उद्यानाला भेट द्या; जाणून घ्या परिपूर्ण माहिती

24
kanha national park : वाघ बघायचा आहे का? मग कान्हा राष्ट्रीय उद्यानाला भेट द्या; जाणून घ्या परिपूर्ण माहिती
कान्हा राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?

मध्य प्रदेशातलं कान्हा राष्ट्रीय उद्यान (kanha national park) हे दरवर्षी १५ ऑक्टोबर ते ३० जून या कालावधीत पर्यटकांसाठी खुलं असतं. कान्हा राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ ही ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान असते. कारण यावेळी इथलं हवामान आल्हाददायक असतं. विशेषतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांच्या दरम्यान जास्तीत जास्त पर्यटक या उद्यानात वन्यजीव सफारीची योजना आखतात. कारण मध्य भारतातल्या हवामानानुसार या वेळचं थंड वातावरण हे प्राणी पाहण्यासाठी योग्य असतं.

याव्यतिरिक्त या महिन्यांत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी पाहायला मिळतात, कारण हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी या उद्यानाला भेट देतात. मार्च ते मे महिन्यांपर्यंत, उद्यानातले वनस्पती सुकलेल्या असतात. या वेळी वाघ पाहण्यासाठी कान्हा राष्ट्रीय उद्यान (kanha national park) जंगल सफारीची योजना आखणे सोपे होते. वाघांचे काही दुर्मिळ फोटो काढू इच्छिणाऱ्या छायाचित्रकार आणि पर्यटकांसाठी मार्च ते मे महिन्याचा काळ हा निश्चितच कान्हा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीसाठी सर्वोत्तम काळ आहे.

(हेही वाचा – valentine’s day quotes : व्हेलेंटाईन डे येतोय; तुमची तयारी झालीय का? valentine’s day साठी सर्वोत्तम quotes वाचा इथे!)

कान्हा राष्ट्रीय उद्यानापर्यंत कसं पोहोचायचं?

कान्हा राष्ट्रीय उद्यान (kanha national park) हे मध्य भारतातील मध्य प्रदेश राज्यातल्या मांडला आणि बालाघाट जिल्ह्यामध्ये वसलेलं आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यानात पोहोचण्यासाठी भारतातल्या बहुतेक ठिकाणांपासून उत्तम हवाई, रस्ते आणि रेल्वे सुविधा आहेत. कान्हा राष्ट्रीय उद्यानाची दोन प्रमुख ठिकाणं आहेत. खटिया आणि मुक्की प्रवेशद्वार.

खटिया प्रवेशद्वार मांडला जिल्ह्यात आणि मुक्की मध्यप्रदेश राज्यातल्या बालाघाट जिल्ह्यात आहे. खटिया प्रवेशद्वारावरून तुम्ही कान्हा राष्ट्रीय उद्यानाच्या (kanha national park) किसली, कान्हा आणि सारी झोनची सफर करू शकता आणि मुक्की प्रवेशद्वारातून आत आल्यास राष्ट्रीय उद्यानाच्या मुक्की झोनची सफर करता येते. खटिया प्रवेशद्वार हे जबलपूर आणि नागपूरपासून रस्त्याने जोडलेले आहे. तर मुक्की प्रवेशद्वार हे जबलपूर, रायपूर आणि नागपूरपासून जोडलेले आहे.

रस्त्याने :

कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या प्रमुख ठिकाणांपासून रस्त्याने जोडलेले आहे.

जवळच्या काही ठिकाणांपासून कान्हा राष्ट्रीय उद्यानाचे अंतर आणि अंदाजे गाडी चालवण्याचा वेळ
  • नागपूर – ३०० किलोमीटर/६ ते ७ तास गाडीने
  • जबलपूर – १६० किलोमीटर/४ तास गाडीने
  • रायपूर – २५० किलोमीटर/५ तास गाडीने
  • बिलासपूर – २५० किलोमीटर/५ तास गाडीने
  • भिलाई – २७० किलोमीटर/५ ते ६ तास गाडीने
  • बांधवगड राष्ट्रीय उद्यान – २५० किलोमीटर/४ तास गाडीने
  • पेंच राष्ट्रीय उद्यान – २०० किलोमीटर/४ तास गाडीने
रेल्वेने :

कान्हा राष्ट्रीय उद्यानात (kanha national park) जाण्यासाठी जवळची रेल्वे स्थानके गोंदिया आणि जबलपूर ही आहेत. गोंदिया रेल्वे स्थानक हे कान्हा राष्ट्रीय उद्यानाच्या खटिया प्रवेशद्वारापासून १४५ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. रेल्वेने इथे पोहोचायला ३ तास लागतात. तर जबलपूर रेल्वे स्टेशन हे कान्हा राष्ट्रीय उद्यानाच्या मुक्की प्रवेशद्वारापासून १६० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. रेल्वेने इथे पोहोचण्यासाठी ४ तास लागतात.

विमानमार्गे :
कान्हा राष्ट्रीय उद्यानापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांत जवळची विमानतळे खाली दिली आहेत 
  • जबलपूर १६० किलोमीटर
  • रायपूर २५० किलोमीटर
  • नागपूर ३०० किलोमीटर

(हेही वाचा – Ind vs Eng, 1st ODI : रवींद्र जडेजाचे ६०० आंतरराष्ट्रीय बळी पूर्ण, ही कामगिरी करणारा पाचवा भारतीय गोलंदाज)

कान्हा राष्ट्रीय उद्यानाचे हवामान
  • कान्हा राष्ट्रीय उद्यानाच्या हवामानात लक्षणीय भिन्नता आढळून येते. पण साधारणपणे हा प्रदेश उष्णकटिबंधीय आहे. उन्हाळ्यात इथलं तापमान ४३℃ पर्यंत पोहोचतं.
  • तर जून ते सप्टेंबर या काळात इथे पावसाळा तुमचं स्वागत करतो. जून-सप्टेंबरच्या मध्यात इथे सरासरी पाऊस १८०० मिमी एवढा असतो.
  • नोव्हेंबर ते मार्चच्या अखेरपर्यंत थंडगार हिवाळा खरोखरच निसर्गरम्य असतो. या काळात इथल्या कुरणांवर दव असतं. हिवाळ्यात इथलं किमान तापमान हे -२℃ एवढं असतं.
  • तर ऑक्टोबर आणि मार्चच्या महिन्यात इथले दिवस सुंदर, टवटवीत आणि सूर्यप्रकाशित असतात.

(हेही वाचा – water lily flower : कमळ आणि वॉटर लिली एकच आहे की वेगवेगळी? जाणून घेऊया रोमांचक तथ्ये!)

कान्हा राष्ट्रीय उद्यानाला भेट देताना सोबत बाळगण्याच्या वस्तू
  • नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू राहणाऱ्या हिवाळ्याच्या हंगामात उबदार कपडे, जॅकेट, हातमोजे, मफलर इत्यादी गोष्टी सोबत बाळगणे आवश्यक आहे. कारण सकाळी जीप सफारी करताना थंडी जास्त असू शकते.
  • एप्रिल ते जून महिन्यांच्या काळात इथलं हवामान उष्ण असतं म्हणून टोपी आणि सनग्लासेस सोबत घ्यावेत. तसंच तुमचा पेहेराव हा सैल हलक्या रंगाचा आणि शक्यतो सुती कापडाचा असावा. सुती कपडे घालण्याची शिफारस केली जाते. या दिवसांमध्ये सनस्क्रीन लोशन लावायला अजिबात विसरू नये.
  • ऑक्टोबर आणि मार्च महिन्यांत इथले दिवस उबदार असतात. त्यामुळे शक्यतो हलके कपडे घालावेत.
  • चमकदार रंग प्राण्यांना त्रास देऊ शकतात म्हणून कपडे बेज, तपकिरी, हिरवे आणि अशा प्रकारच्या म्यूट जंगल शेड्समध्ये असावेत. जसे की, तटस्थ आणि मातीच्या रंगाचे कपडे.
  • सफारी करताना जंगलात दुर्बिणी आणि कॅमेरे सोबत बाळगावेत. तसंच अतिरिक्त बॅटरी आणि फिल्म रोलसह दुर्बिणी आणि कॅमेरा सोबत ठेवावा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.