‘हा’ परदेशी पाहुणा तीन वर्षांनी राजापूरात दाखल!

263

केवळ पांढरी मान आणि शरीराचा अन्य भाग काळा अशी रंगछटा असलेला करकोचा-कांडेसर या स्थलांतरित पक्ष्यांचे सुमारे तीन वर्षांनंतर राजापूर परिसरात पुन्हा एकदा आगमन झाले आहे. गेल्या महिनाभरापासून शहरात अर्जुना नदीच्या काठावर आणि आडीवरे परिसरामध्ये त्याचे वास्तव्य आहे.

( हेही वाचा : संपूर्ण लसीकरण झालेले भारतीय ‘या’ 7 देशात जाऊ शकतात! )

स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन

सीगल पक्ष्यांसह अन्य स्थलांतरीत पक्ष्यांचे राजापूर तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर दरवर्षी आगमन होते. त्यात करकोचा-कांडेसर या पक्ष्याचाही समावेश आहे. मध्यंतरी सुमारे तीन वर्षे थंडीच्या कालावधीमध्ये दिसणारा हा पक्षी आढळला नव्हता. त्यावेळची पर्यावरणीय स्थिती त्याच्या वास्तव्याला अनुकूल नसल्याचा अंदाज पक्षिमित्र धनंजय मराठे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पर्यावरणीय स्थिती अनुकूल असल्याने त्याचे आगमन आणि वास्तव्य असून त्याचे झालेले आगमन आणि वास्तव्य सुखद आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्रातील ‘पाच’ भव्य सागरी किल्ले! )

दोनशेहून अधिक पक्षी

यावर्षी राजापूर शहरासह आडिवरे परिसरात हा पक्षी दिसत आहे. त्यामुळे पक्षीप्रेमी सुखावले आहेत. केवळ पांढरी मान आणि बाकी सर्व शरीर काळेकुळकुळीत अशी त्याच्या शरीराची रंगसंगती आहे. गिधाडासारखा काहीसा दिसणारा हा पक्ष पाणथळ भागामध्ये बहुतांशवेळा आढळतो. थव्याने राहण्याऐवजी एकटेच राहण्याला त्याची पसंती असते. काही वर्षापूर्वी वन विभागातर्फे पाणपक्ष्यांच्या सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये विविध प्रकारच्या सतरा प्रजातींचे सुमारे दोनशेहून अधिक पक्षी आढळले होते. त्यामध्ये करकोचा-कांडेसर या पक्ष्याचाही समावेश होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.