Cake खाणाऱ्यांनो व्हा सावधान; केकमधील ‘या’ घटकामुळे होऊ शकतो कॅन्सर

कर्नाटकच्या अन्न सुरक्षा विभागाने केले २३५ केकच्या नमुन्यांचे परिक्षण

151
Cake खाणाऱ्यांनो व्हा सावधान; केकमधील 'या' घटकामुळे होऊ शकतो कॅन्सर
Cake खाणाऱ्यांनो व्हा सावधान; केकमधील 'या' घटकामुळे होऊ शकतो कॅन्सर

वाढदिवसाला किंवा अन्य कुटुंबिक कार्यक्रमांना केक कापणे ही एकप्रकारची फॅशन झालेली आहे. मात्र केकमुळे (Cake) कॅन्सर होऊ शकतो, असे एका अहवालातून उघडकीस आले आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये केकमध्ये कॅन्सर निर्माण करणारे पदार्थ आढळून आले आहेत. ज्यामुळे केकशी (Cake) संबंधित संभाव्य जोखमीबद्दल लोकांना कर्नाटकच्या (Karnataka) अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने चेतावणी दिली आहे.

( हेही वाचा :  SBI बँकेची बनावट शाखा, बेरोजगार तरुणांनी कायमस्वरुपी नोकरीसाठी दिली लाखोंची लाच

दरम्यान कर्नाटकच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने (Food Safety & Quality Assurance Infrastructure) एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये सांगण्यात आले की, बंगळुरुमधील अनेक बेकरीमधून गोळा केलेल्या केकच्या १२ नमुन्यांमध्ये अनेक कर्करोग (Cake) निर्माण करणारे घटक आढळले आहेत. केकमधील हे घटक कर्करोगास कारणीभूत असल्याचे विभागाने सांगितले आहे.

दरम्यान कर्नाटकच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने रोडामाइन-बीसह कृत्रिम खाद्य रंगाच्या वापरावर राज्यात बंदी घातली आहे. कर्नाटक सरकारने २३५ केक (Cake) नमुन्यांपैकी २२३ सुरक्षित असल्याचे आढळले, परंतु १२ मध्ये कृत्रिम रंग असल्याने ते धोकादायक असल्याचे कळले. यामध्ये रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट (Black Forest) यांसारख्या लोकप्रिय फ्लेवरमध्ये यांचा समावेश आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.