Kaushalya Hospital Thane : कोण आहेत कौशल्य मेडिकल फाउंडेशनचे सर्वेसर्वा?

14
Kaushalya Hospital Thane : कोण आहेत कौशल्य मेडिकल फाउंडेशनचे सर्वेसर्वा?
Kaushalya Hospital Thane : कोण आहेत कौशल्य मेडिकल फाउंडेशनचे सर्वेसर्वा?

ठाणे शहर आणि जिल्ह्याच्या वाढत्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य मेडिकल फाउंडेशनची स्थापना १९८५ साली करण्यात आली. या ट्रस्टचे संस्थापक डॉ. एच. एस. भानुशाली, डॉ. एम. व्ही. सोहोनी आणि डॉ. ए. एच. भानुशाली हे आहेत. सामान्य शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक्स, स्त्रीरोग इत्यादीसारख्या शल्यचिकित्सा क्षेत्रांसाठी परवडणारे वैद्यकीय उपचार ठाणे आणि त्याच्या आसपास असलेल्या मध्यमवर्गीय लोकांना मिळायला हवेत असा त्यांचा हेतू आहे. म्हणूनच डॉक्टर शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरतात ते कौशल्य दर्शवण्यासाठी “कौशल्य” हे नाव या ट्रस्टसाठी निवडलं गेलं. (Kaushalya Hospital Thane)

सुरुवातीला ठाणे स्टेशनजवळ एक छोटेसं हॉस्पिटल सुरू करण्यात आलं. या हॉस्पिटलमध्ये प्रामुख्याने जनरल वॉर्ड बेड्स आणि ऑपरेशन थिएटर होतं. इथे डॉक्टर विशेषत: ठाण्यातले शल्यचिकित्सक अत्यंत कमी खर्चात आणि कित्येकदा तर मोफत ऑपरेशन करायचे. त्यानंतर लवकरच या हॉस्पिटलला नाव दिलं गेलं. काही वर्षांनंतर ट्रस्टी राजन सुजानानी यांच्या देणगीतून हॉस्पिटलमध्ये आणखी काही बेड्स आणि ऑपरेशन थिएटर वाढवून त्या हॉस्पिटलचं रिनोव्हेशन आणि विस्तार करण्यात आला. (Kaushalya Hospital Thane)

(हेही वाचा – durga puja 2024 मधील दुर्गा पूजा कधी सुरू होणार, जाणून घ्या…  )

या हॉस्पिटलमध्ये शेकडो रुग्णांनी अत्यंत कमी खर्चात उपचार घेतलेले आहेत. इथले डॉक्टर आपल्या नफ्यासाठी उपचार करत नाहीत. हे इथल्या ट्रस्टीना माहीती होतं. म्हणूनच त्यांनी या मॉडेलला उच्च पातळीवर आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना फळ मिळालं. (Kaushalya Hospital Thane)

२१ डिसेंबर २००२ साली पाचपाखाडी येथे १०० बेड्स असलेलं हॉस्पिटल उभारण्यात आलं. त्या वेळी ते ठाण्यातलं असं एकमेव ट्रस्टी हॉस्पिटल होतं ज्यात मुंबईतल्या अनेक हॉस्पिटल्सप्रमाणे अत्याधुनिक सुविधा होत्या. तसंच ते ठाण्यातलं ते सर्वांत मोठं प्रायव्हेट हॉस्पिटल होतं. रूग्णांच्या सोईला प्राधान्यता देऊन या हॉस्पिटलची रचना करण्यात आली होती.

(हेही वाचा – Tilak Smarak Mandir Pune या ठिकाणांचे काय आहेत प्रमुख वैशिष्ट्ये?)

कौशल्य हॉस्पिटलची वैशिष्ट्ये

या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, ICU, कार्डियाक ICU, बालरोग ICU, नवजात ICU, पॅथलॅब, २४ तास आपत्कालीन आणि अपघात सेवा, खाजगी, अर्ध-खाजगी आणि २४ तास निदान सेवा असलेले १५० बेड्स आहेत. तसंच अग्रगण्य खाजगी आरोग्य विमा आणि अनेक कॉर्पोरेट्ससह कॅशलेस आरोग्य विम्यासाठी हे हॉस्पिटल GIPSA सोबत पॅनेलमध्ये आहे. (Kaushalya Hospital Thane)

याव्यतिरिक्त या हॉस्पिटलमध्ये ठाण्यातल्या नावाजलेल्या स्पेशालिटी डॉक्टरांची उत्तम टीम आहे. हे हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी असलं तरी इथे सर्वांना खासकरून मध्यमवर्गीय लोकांना परवडणारे उपचार देण्याचं ध्येय इथले डॉक्टर तंतोतंत पाळतात. तसंच इथे २००६ सालापासून पात्र गरीब रुग्णांसाठी आयपीएफ योजना यशस्वीपणे चालवली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.