Kaynes Share Price : सर्वकालीन सर्वोत्तम किमतीवर असलेला हा शेअर अजूनही वर जाण्याचा संशोधन संस्थांचा अहवाल 

Kaynes Share Price : शेअर बाजाराच्या पडझडीतही हा शेअर टिकून आहे

99
Kaynes Share Price : सर्वकालीन सर्वोत्तम किमतीवर असलेला हा शेअर अजूनही वर जाण्याचा संशोधन संस्थांचा अहवाल 
Kaynes Share Price : सर्वकालीन सर्वोत्तम किमतीवर असलेला हा शेअर अजूनही वर जाण्याचा संशोधन संस्थांचा अहवाल 
  • ऋजुता लुकतुके

शेअर बाजारात सध्या पडझडीचं वातावरण असताना केन्स टेक्नोलॉजीज् हा एक शेअर तग धरून आहे. उलट या आठवड्यात शेअरने सर्वकालीन उच्चांकही नोंदवला आहे. ७७८० रुपयाला तो स्पर्श करून आला आहे. त्यानंतर तो थोड्या पडझडीनंतर ७,२९४ रुपयांवर स्थिरावला आहे. शेअरमध्ये एका आठवड्याभरात जवळ जवळ ४ टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली आहे. आणि अजूनही संशोधन संस्था या शेअरबद्दल सकारात्मक आहेत. (Kaynes Share Price)

(हेही वाचा- Border – Gavaskar Trophy 2024 : बॉर्डर – गावसकर कसोटी मालिकेला प्रेक्षकांची पसंती, ८६ दशलक्ष लोकांनी पाहिल्या पहिल्या २ कसोटी )

२००८ साली स्थापन झालेली केन्स टेक्नोलॉजी ही कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी मागणीबरहुकूम उत्पादनं बनवते. इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेली ही कंपनी विमान उद्योग, संरक्षण सामुग्री, अवजड वाहनं आणि एअरोस्पेस अशा उद्योगांना सेवा पुरवते. कंपनीचं भाग भांडवल ४५,००० कोटी रुपयांचं आहे. (Kaynes Share Price)

Untitled design 42

केन्स कंपनीबद्दल संशोधन संस्थांनी सकारात्मक चित्र उभं केलं असून आणखी १२ महिन्यात हा शेअर ८,४०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो, मोतीलाल ओस्वाल वेल्थ कंपनीने म्हटलं आहे. तर नजीकच्या काळातही शेअरमध्ये २० टक्के वाढीचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यासाठी मूलभूत दृष्टिकोण ठेवून मोतीलाल ओस्वाल संस्थेनं काही गोष्टी नमूद केल्या आहेत. (Kaynes Share Price)

(हेही वाचा- Kalyan Marathi Family Case : मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे दिवस फिरले; आरटीओने केली मोठी कारवाई)

अलीकडेच सरकाने केन्स सेमिकॉनला गुजरातच्या साणंद इथं ओएसएटी सुविधा उभी करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे सरकारी पाठबळ त्यातून अधोरेखित होतं. तर कंपनीचे ताजे तिमाही आकडेही चांगले आहेत. कंपनीच्या वार्षिक नफ्यातही भरघोस वाढ झाली आहे. तर कंपनीने काही विस्ताराच्या योजना आखताना त्या पूर्ण करण्यासाठी काही प्रकल्प अधिग्रहणाचे प्रस्ताव ठेवले आहेत. त्यातही उद्योगक्षेत्राला गुंतवणुकीची संधी दिसत आहे. या कारणांमुळे सध्या कंपनीचा शेअर वर आहे. (Kaynes Share Price)

  • केन्स टेक्नोलॉजी लिमिटेड 

सध्याची किंमत – ७,२९४

भाग भांडवल- ४५,००० कोटी

सर्वकालीन सर्वोत्तम किंमत – ७,७८०

ईपीएस गुणोत्तर – १९५.२५

ईपीएस – ३७.०२

(हेही वाचा- Bus Accident: ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर)

शेअरचे आकडे सध्या चांगले असले तरी इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात सध्या प्रचंड स्पर्धा आहे. आणि ते गृहित धरून कंपनीच्या कामगिरीवर सातत्याने नजर ठेवण्याची गरज आहे. (Kaynes Share Price)

(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट वाचकांना गुंतवणुकीचा कुठलाही सल्ला देत नाही) 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.