5G मोबाईल खरेदी करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा; अन्यथा इंटरनेट स्पीड मिळेल 4G पेक्षा कमी

124

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर २०२२ रोजी देशभरात 5G सेवा लॉंच केली. आता संपूर्ण देशभरात टप्प्याटप्प्याने 5G सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अहमदाबाद, बंगळुरू, चंदिगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरूग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, पुणे, सिलीगुडी आणि वाराणसी या काही प्रमुख शहरांचा 5G सेवेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे.

( हेही वाचा : MSRTC : प्रवाशांच्या खिशाला कात्री; दिवाळीनिमित्त ‘एसटी’ची हंगामी भाडेवाढ! या तारखेपासून होणार लागू…)

जिओची (Jio) 5G सेवा दिवाळीपासून पूर्ण क्षमतेने सुरू होईल, तर Airtel ने यापूर्वीच आपली 5G सेवा सुरू केलेली आहे. त्यामुळे आता बरेच युजर्स फास्ट इंटरनेट स्पीडचा आनंद घेण्यासाठी 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहेत. पण 5G स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या मोबाईलचे इंटरनेट व्यवस्थित सपोर्ट करणार नाही.

5G स्मार्टफोन खरेदी करताना काय काळजी घ्याल?

तुम्ही नवा 5G मोबाईल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सिंगल 5G बॅंड असलेला फोन खरेदी करू नका. सिंगल बॅंड असलेले स्मार्टफोन 4G स्पीड देतील. त्यामुळे उत्तम 5G स्पीडसाठी जास्त बॅंड असलेला स्मार्टफोन खरेदी करा.

सब-6GhZ 5G फ्रिक्वेन्सी सपोर्ट असलेले स्मार्टफोन खरेदी करणे. यामुळे फोनला उत्तम नेटवर्क आणि अधिक कव्हरेज क्षेत्र मिळते. 5G स्मार्टफोन खरेदी करताना mmWave रेडिओ फ्रिक्वेन्सी असलेले फोन घेणे टाळावे.

5G स्मार्टफोन खरेदी करताना बॅटरीची क्षमता नक्की तपासून घ्या. कारण 5G इंटरनेटचा स्पीड जास्त असतो यामुळे फोन खरेदी करताना चांगली बॅटरी असलेला फोन निवडा. 5G फोनमध्ये, सिग्नल प्राप्त करण्यासाठी तीन अतिरिक्त अँटेना प्रदान केले जातात. जर तुम्ही कमी बॅटरी असलेला फोन वापरत असाल तर तुमची बॅटरी गरम होण्याची आणि बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याची शक्यता असते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.