KEI Share Price : केईआय इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये इतकी पडझड का झाली?

KEI Share Price : मागच्या एका आठवड्यात कंपनीचा शेअर १३ टक्क्यांनी खाली आला आहे.

30
KEI Share Price : केईआय इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये इतकी पडझड का झाली?
  • ऋजुता लुकतुके

केईआय इंडस्ट्रीज ही भारतातील एक आघाडीची केबल आणि वायर बनवणारी कंपनी आहे. पॉलीकॅब आणि केईआय या या क्षेत्रातील दोन नावाजलेल्या कंपन्या आहेत. पण, दोघांचेही शेअर या आठवड्यात जोरदार पडले. त्यासाठी कारणीभूत ठरली एक बातमी. अदानी समुहाच्या मालकीची एक कंपनी कच कॉपर लिमिटेडने प्रणिता इकोकेबल्सशी एक सहकार्य करार केला आहे आणि त्यानुसार, ही कंपनी आता वायर आणि केबल बनवण्याच्या उद्योगात उतरणार आहे. नवीन कंपनीत अदानी समुहाचा ५० टक्के वाटा असेल. आधीच आरआर केबल, हॅवेल्स, फिनोलेक्स अशा कंपन्यांमुळे गजबजलेल्या या बाजारपेठेत अदानी समुहाची कंपनी उतरली तर आधीच असलेली स्पर्धा आणखी तीव्र होणार हे उघड आहे. त्याचा परिणाम या बाकीच्या कंपन्यांवर जाणवत आहे. सर्वच केबल, वायर उत्पादक कंपन्या या आठवड्यात खाली आल्या. शुक्रवारी बाजार बंद होताना मात्र केईआय इंडस्ट्रीजचा शेअर थोडासा सावरला आहे आणि १.३५ टक्क्यांच्या वाढीसह तो २,८८० वर बंद झाला. एरवी एका आठवड्यात या शेअरमध्ये २०१ अंशांची घसरण झाली आहे. (KEI Share Price)

(हेही वाचा – Voltas Share Price : वोल्टासच्या वाटचालीला संशोधन संस्थांच्या अहवालानंतर ब्रेक)

New Project 2025 03 23T082130.715

गेल्या बुधवारी अदानी समुहाने आपण या उद्योगात प्रवेश करत असल्याचं शेअर बाजाराला कळवलं आणि तिथून ही पडझड सुरू झाली. शिवाय अदानी समुहाची कंपनी ही उत्पादनाबरोबर वितरण आणि विपणनही स्वत: करणार आहे. तसंच धातूची उत्पादनं आणि केबल ही कंपनी बनवणार आहे. अदानी समुहाबरोबरच बिर्ला समुहानेही या उद्योगात आधीच प्रवेश केला आहे. (KEI Share Price)

पण, पहिल्या दोन दिवसांच्या घसरणीनंतर मात्र केईआय इंडस्ट्रीजचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल गुप्ता यांनी पत्रकारांसमोर येऊन आपली बाजू मांडली. ‘मोठे समुह या उद्योगात येत असले तरी कंपनी सुरू करून उत्पादन तयार करण्यापर्यंतचा कालावधी या उद्योगासाठी खूप मोठा आहे. त्यामुळे नवीन उत्पादनं बाजारात दिसेपर्यंत २ वर्षांचा कालावधी तरी लागेल. तोपर्यंत सध्याच्या कंपन्यांना धोका नाही,’ असं गुप्ता यांनी बोलून दाखवलं. त्यानंतर केईआय बरोबरच इतर कंपन्यांचे शेअरही शुक्रवारी सावरले. (KEI Share Price)

(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीवर कुठलाही सल्ला देत नाही)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.