बाजारात येणारा आंबा खरचं “हापूस” आहे का? वाचा

171

एप्रिल-मे महिना आला की, आतुरता लागते कोकणातील आंब्याची! कोकणातील हापूस आंबा हे सर्वांचे आवडते फळ त्यामुळे आंब्यांच्या पेट्यांना बाजारात मोठी मागणी असते. परंतु अनेकवेळा हापूस आंब्यांची जाण नसलेल्या लोकांची आंबे विकत घेताना फसवणूक होते. असाच प्रकार पुण्यात घडला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डात केरळ आंब्याची ‘देवगड हापूस’ या नावाने विक्री केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने फळ बाजारातील तिघांवर यासंदर्भात कारवाई करून त्यांच्याकडून ७ हजार ८० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये आंब्याचे १ डझनचे ४२ बॉक्स बाजार समितीने जप्त केले आहेत.

( हेही वाचा : होळीच्या सणाला पाण्याने भरलेले फुगे, पिशव्या मारताय? तर वाचा राज्य सरकारची नियमावली )

ग्राहकांची फसवणूक 

बाजारात कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची देवगड, रत्नागिरी येथून आवक होते. त्याशिवाय केरळ, कर्नाटकातूनही आंबा येतो. मात्र, दोघांच्या चव आणि सालीमध्ये फरक आहे. कोकणातील हापूस आंबा रसाळ आणि चवीस चांगला असतो. त्यामुळे कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत व्यापारी, विक्रेते नागरिकांची फसवणूक करतात. बाजारपेठांमध्ये आंब्यांची अदलाबदल करून विक्री केली जाते. हंगामाच्या सुरवातीला असा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे बाजार समिती यापुढे काय कारवाई करते हे महत्वाचे ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.