Khajji Nag Temple : खज्जियार इथल्या नाग मंदिराचा इतिहास!

89
Khajji Nag Temple : खज्जियार इथल्या नाग मंदिराचा इतिहास!

खज्जियार नाग मंदिराचं नयनरम्य सौंदर्य

भारतातल्या हिमाचल प्रदेशातलं खज्जियार हे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकशे साठ ठिकाणांपैकी एक आहे. ते ठिकाण म्हणजे पाइन आणि देवदार वृक्षांच्या जंगलांनी वेढलेलं एक लहानसं नयनरम्य बशीच्या आकाराचं पठार आहे.

खज्जियार हे डलहौसीपासून सुमारे २४ किमी एवढ्या अंतरावर असलेलं चंबा इथलं एक छोटेसं पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून ६,५०० फूट एवढ्या उंचीवर वसलेलं आहे. खज्जियार इथल्या निसर्गरम्य वातावरणात प्रवेश करताच तुम्हाला स्वर्गात आल्याचा भास होईल. इथे येणाऱ्या पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी पिवळ्या स्विस चिन्हाने हायकिंग मार्गावर तुम्हाला “मिनी स्वित्झर्लंड” असं लिहिलेलं दिसेल. (Khajji Nag Temple)

(हेही वाचा – Yuvraj Singh : युवराज सिंग दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक?)

घनदाट पाइन्स, देवदार आणि हिरव्यागार कुरणाच्या कुशीमध्ये खज्जियार हे ठिकाण पश्चिम हिमालयाच्या भव्यदिव्य धौलाधर या पर्वतरांगांच्या पायथ्याशी अतिशय निवांतपणे वसलेलं आहे. बशीच्या आकाराचं खज्जियार हे इथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यातील एक विहंगम आणि रोमांचक अनुभव प्रदान करतो. असं म्हटलं जातं की, एका स्विस राजदूताने ७ जुलै १९९२ साली खज्जियार या ठिकाणी अधिकृतपणे बाप्तिस्मा घेतला. इथला एक दगड नेण्यात आला. तो दगड स्वित्झर्लंडची राजधानी बर्ने येथे उभारलेल्या दगडी शिल्पाचा एक भाग बनला.

चंबा ते डलहौसी या रमणीय आणि निसर्गरम्य ठिकाणापर्यंतचा प्रवास HP पर्यटन विकास महामंडळाच्या बसने किंवा स्वतःच्या खाजगी वाहनाने केला जाऊ शकतो. खज्जियार हे पठाणकोट रेल्वे स्टेशनपासून सुमारे ९५ किमी अंतरावर आहे. तसंच ते कांगडा जिल्ह्यातल्या गग्गल नावाच्या विमानतळापासून १३० किमी एवढ्या अंतरावर आहे. (Khajji Nag Temple)

(हेही वाचा – Drugs : बँकॉकहून फूड पाकिटातून आले अंमली पदार्थ; तिघांना अटक)

खज्जियार इथलं नाग मंदिर

खज्जियार हे ठिकाण इथल्या लोकप्रिय असलेल्या खज्जी नागा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात नाग देवतेची पूजा केली जाते. हे नाग मंदिर १० व्या शतकातलं आहे. या मंदिराच्या छतावर आणि लाकडी चौकटींवर वेगवेगळ्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. या मंदिरात हिंदू आणि मुघल स्थापत्यशैलीच्या मिश्रणाची झलक तुम्हाला पाहायला मिळेल. छत आणि लाकडी चौकटींवर अप्रतिम प्रतिमा कोरलेल्या आहेत. या नाग मंदिरात एक प्रशस्त सभामंडप आहे. हा सभामंडप लाकडी भारदस्त दारांनी बंदिस्त करून ठेवला आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचं ठिकाण घुमटाच्या आकाराचे देवस्थान हे चुनखडीच्या खाणीतून काढलेल्या स्लेटपासून तयार केलेलं आहे. या नाग मंदिराशेजारीच महादेव आणि हिडिंबा देवीचीही मंदिरे आहेत. (Khajji Nag Temple)

(हेही वाचा – Bank Holidays in September : सप्टेंबर महिन्यात कुठल्या सणाला बँका राहणार बंद? कधी असणार सुरू?)

खज्जियारच्या नाग मंदिरात कसं पोहोचायचं?

  • विमानाने

या ठिकाणाहून पठाणकोट हे ९९ किलोमीटर अंतरावर असलेलं सर्वांत जवळचं विमानतळ आहे.

याव्यतिरिक्त १३० किलोमीटरच्या अंतरावर कांगडा, २२० किलोमीटरच्या अंतरावर अमृतसर आणि ४०० किलोमीटरच्या अंतरावर चंडीग्रह ही या ठिकाणी पोहोचण्यायोग्य इतर विमानतळे आहेत.

  • ट्रेनने

खज्जियार येथे पोहोचण्यासाठी पठाणकोट हे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे. याव्यतिरिक्त खज्जियार पासून ९४ किमी एवढं अंतर असलेल्या नवी दिल्लीहून पठाणकोटला जाण्यासाठी नियमित गाड्या उपलब्ध आहेत.

  • रस्त्याने

हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन सिमला, सोलन, कांगडा, धर्मशाला आणि पठाणकोट येथील त्यांच्या मुख्य स्टँडपासून आणि दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड (UT) या लगतच्या राज्यांमधून लांब पल्ल्याच्या सेवा चालवल्या जातात. याव्यतिरिक्त खाजगी बसेसही इतरत्र सर्वत्र सेवा देतात. या बसेसची फ्रिक्वेन्सी देखील चांगली आहे आणि या बसेसमधून प्रवास करणं हे सुद्धा आरामदायी असतं. (Khajji Nag Temple)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.