यावर्षी तब्बल १९ वर्षांनी अधिक मास आणि श्रावण महिना एकत्र आला आहे. यावर्षीचा अधिक मास हा १८ जुलैपासून सुरु झाला असून १६ ऑगस्ट रोजी संपणार आहे. १६ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिकमासला मलमास, संसर्प मास, पुरुषोत्तम महिना देखील म्हटलं जातं. तर खान्देशात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं. हिंदू धर्मात अधिकमास अतिशय पवित्र मानला जातो. अधिक महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते.
खान्देशात अधिक महिन्यात जावयाला सासरी बोलवून त्याचा मानपान केला जातो. हिंदू धर्मात मुलगी-जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. त्यामुळे मुलगी-जावयाला वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जातात त्यात जावायाला चांदीचे वाण दिले जाते.
पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार देवी लक्ष्मीला चांदी हा धातू अतिशय प्रिय असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या धोंड्याच्या महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू दिल्या जातात. या महिन्यात सासुरवाशीणीचे आई वडील जावयला घरी बोलवून त्यांची रितसर पूजा अर्चा करुन पंचपक्वानाने त्यांचा मानपान केला जातो. जावयाला अधिकमासाचं वाण दिलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का की खान्देशात अधिक मासात जावयाला एवढं महत्त्व का असतं ते?
(हेही वाचा – “राहुल गांधींनी मणिपूर पेटवण्याचं काम केलं”, स्मृती इराणी यांची राहुल गांधींसह काँग्रेसवर जहरी टीका)
हिंदू धर्मात विवाह प्रथेनुसार जावयाला नारायणाचं रुप मानलं जातं. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास असतो. त्यामुळे या महिन्यात जावयाला नारायण रुप मानून पूजा केली जाते. म्हणून हिंदू धर्मात लग्न झालेल्या जोडप्यांना लक्ष्मी नारायणाचं रुप मानलं जातं. म्हणून अधिक मासात जावयाला तूपातील ३३ अनारसे दिले जातात. एका चांदी किंवा तांब्याच्या ताटात हे अनारसे सजवून त्यात तुपाचा दिवा लावून हे वाण जावयाला दिलं जातं. यालाच जावयाचं वाण असं म्हणतात.
देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशिर्वाद मिळविण्यासाठी दिप दानाला महत्त्व आहे. म्हणून जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात. जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणाम कमी होतात. म्हणून जावयाला अधिक मासात बोलवून त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवून ३३ अनारसे, ३३ बत्तासेसोबत एक चांदीचं निरांजन देऊन ३३ दिव्यानी जावयाचे औक्षण केले जाते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community