Kia EV9 : एका चार्जमध्ये ५६१ किमी धावणारी कियाची फ्लॅगशिप एसयुव्ही भारतात लाँच 

Kia EV9 : किया ईव्ही९ ची किंमत १.३ कोटी रुपये इतकी आहे 

47
Kia EV9 : एका चार्जमध्ये ५६१ किमी धावणारी कियाची फ्लॅगशिप एसयुव्ही भारतात लाँच 
Kia EV9 : एका चार्जमध्ये ५६१ किमी धावणारी कियाची फ्लॅगशिप एसयुव्ही भारतात लाँच 
  • ऋजुता लुकतुके 

ऑटोमोबाईल क्षेत्रात ‘वर्ल्ड कार ऑफ द ईयर’ हा पुरस्कार मानाचा आहे. यंदा म्हणजे २०२४ ची सर्वोत्तम जागतिक कार ठरली आहे ती कियाची ईव्ही९. नावाप्रमाणेच ही पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. महत्त्वाचं म्हणजे तीन रांगांची मोठी एसयुव्ही आहे. त्यामुळे भारतात दाखल होणारी ही पहिली कौंटुंबिक इलेक्ट्रिक एसयुव्ही असेल. ८ जणांची आसन क्षमता आणि तरीही आरामदायी आणि सामान ठेवण्याचीही सोय असलेली ही एसयुव्ही भारतात नक्की चालेल अशी कंपनीला आशा आहे. म्हणूनच या वर्षीच्या शेवटी ती भारतात लाँच करण्याची तयारी कंपनीने चालवली आहे. (Kia EV9)

खरंतर इलेक्ट्रिक कार या एअरोडायनॅमिक डिझाईनच्या असतात. म्हणजे पुढे आणि मगे त्यांचा आकार निमुळता होत जातो. पण, ईव्ही९ याला पूर्णपणे अपवाद आहे. ती कौंटुंबिक म्हणजे कुटुंबाला सामावून घेणारी बॉक्सी कार आहे. बाहेरून ती एका कलात्मक ठोकळ्यासारखी दिसते. (Kia EV9)

(हेही वाचा- Women’s T20 World Cup : पाकिस्तानचा पराभव करत भारतीय महिला उपांत्य शर्यतीत कायम)

पुढे एलईडी दिव्यांची एक माळ आहे. हे दिवे आडवे आहेत. तर आतून ही गाडी इतर किया गाड्यांसारखीच आहे. चालकाच्या सीटसमोर दोन डिजिटल डिस्प्ले आहेत. यातील इन्फोटेनमेंट स्क्रीन ही जास्त मोठी आहे. यातील साऊंड सिस्टिम तर १४ स्पीकरची आहे. (Kia EV9)

 भारतातील ईव्ही९ ही कार कियाच्या ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. या इंजिनातून ३७९ हॉर्सपॉवरची शक्ती निर्माण होते. शून्य ते १०० किमींचा वेग ही गाडी फक्त ५.३ सेकंदांत गाठते. पण, जागतिक स्तरावर ३ प्रकारांमध्ये ईव्ही९ उपलब्ध आहे. ७६.१ किलोवॅट क्षमतेची बॅटरी असलेल्या गाडीत २१४ बीएचपी क्षमतेचं इंजिन आहे. ही गाडी एका चार्जमध्ये ३५८ किलोमीटर धावू शकते. तर ९९.८ किलोवॅट बॅटरी असलेली गाडी ५४१ किमीपर्यंत धावते.  (Kia EV9)

(हेही वाचा- BMW M3 : बीएमडब्ल्यूची ‘हाय-परफॉर्मन्स स्पोर्टी’ कार भारतात दाखल होण्याच्या वाटेवर, कोलकात्यात शोरुम सुरू)

किया ईव्ही ६ नंतर किया कंपनीने पहिल्यांदाच फक्त इलेक्ट्रिक व्हेईकल असलेली गाडी आणली आहे. पण, विशेष म्हणजे कियाने ईव्ही ६ भारतातून २०२३ साली काढून घेतली होती. पण, आता पुन्हा एकदा ईव्ही आणण्याची तयारी चालवली आहे.  (Kia EV9)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.