kims hospital : कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच kims hospital कोणाच्या मालकीचं आहे?

54
kims hospital : कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच kims hospital कोणाच्या मालकीचं आहे?

कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच केआयएमएस हे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लिमिटेडच्या मालकी हक्काचं आहे. इथल्या संचालक मंडळात डॉ. बी. भास्कर राव हे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.

कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस केआयएमएस ही तेलंगणा येथे स्थित असलेली एक भारतीय हॉस्पिटल्सची चेन आहे. याची स्थापना डॉ. भास्कर राव बोलिनेनी यांनी २००० साली नेल्लोर शहरात केली होती. सध्या केआयएमएस या ग्रुपची आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये १२ हॉस्पिटल्स आहेत. केआयएमएस हॉस्पिटल ग्रुप हे एनएबीएच आणि एनएबीएल द्वारे प्रमाणित आहे. हे हॉस्पिटल्स बीएसई आणि एनएसई वर सूचीबद्ध केलेले आहे. (kims hospital)

(हेही वाचा – dr agarwal eye hospital : कोण आहेत dr agarwal eye hospital चे सीईओ?)

केआयएमएस चा इतिहास

किम्स ग्रुपमधलं सर्वात जुनं हॉस्पिटल हे २००० साली नेल्लोर येथे डॉ. भास्कर राव बोलिनेनी यांनी सुरू केलं होतं. डॉ. भास्कर राव बोलिनेनी हे एक हृदयरोग तज्ज्ञ आणि सर्जन होते. त्यांनी ३०,००० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यानंतर २००२ साली त्यांनी राजामुंद्री येथे आणखी एक हॉस्पिटल सुरू केलं.

२००४ साली किम्स ग्रुपचं प्रमुख हॉस्पिटल ‘किम्स सिकंदराबाद’ हे सुरू करण्यात आलं. आता ते १००० बेड उपलब्ध असलेलं हॉस्पिटल आहे. त्यानंतर पुढच्या दशकामध्ये किम्स ग्रुपने आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या इतर अनेक शहरांमध्ये आपल्या हॉस्पिटल्सचा विस्तार वाढवला आणि एकूण ४,००० बेड्सची क्षमता गाठली. (kims hospital)

२०१५ आली किम्स हॉस्पिटलला आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधलं पहिलं ग्रीन ऑपरेशन थिएटर प्रमाणपत्र मिळालं. पुढे २०१७ साली तेलंगणा प्रदेशासाठी रुग्ण-अनुकूल रुग्णालय श्रेणीमध्ये किम्स हॉस्पिटलला ‘असोसिएशन ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्स इंडिया (एएचपीआय) पुरस्कार २०१७’ प्रदान करण्यात आला होता. डॉ. भास्कर राव यांचे मोठे पुत्र, अभिनय बोलिनेनी, सध्या किम्स हॉस्पिटल्सचे सीईओ आहेत.

२०२१ साली कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने त्यांचं प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ सुरू केलं आणि ते एक सार्वजनिक कंपनीच्या रुपात उदयास आले. सध्या देशभरात आपली व्याप्ती व्याप्ती वाढवत आहेत. (kims hospital)

(हेही वाचा – CC Road : खड्डेमुक्तीचा संकल्प पूर्ण करताना दर्जाकडे दुर्लक्ष नको!)

किम्स हॉस्पिटलमध्ये देण्यात येणाऱ्या सेवा

किम्स हॉस्पिटल्स येथे कार्डिओलॉजी, कार्डिओथोरॅसिक आणि कार्डिओव्हस्कुलर सर्जरी, त्वचारोग, दंत, मधुमेह, ईएनटी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, ऑन्कोलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, प्रसूती आणि स्त्रीरोग, अवयव प्रत्यारोपण, ऑर्थोपेडिक्स, बालरोग, पल्मोनोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, रूमेटोलॉजी, रोबोटिक्स आणि मूत्रविज्ञान यांसारख्या अनेक सेवा देतात. (kims hospital)

  • अवयव प्रत्यारोपण

किम्स हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी त्यांनी अवयवदान स्वॅप रजिस्ट्रीसुद्धा तयार केलेली आहे. २०१९ साली किम्स सिकंदराबाद येथे १,००० मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांची नोंद झाली आहे. किम्स हॉस्पिटल्स येथे फुफ्फुस प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांनी कोविड-१९ च्या रुग्णावर दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. भारतात अशा प्रकारची प्रत्यारोपण प्रक्रिया पहिल्यंदाच करण्यात आली होती.

सप्टेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या सालांदरम्यान किम्स हॉस्पिटलमध्ये हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण पथकाने १२ कोविड-१९ दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपण प्रक्रिया आणि एकूण ५० फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया पार पाडल्या आहेत.

कोविड-१९ दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एकाच आरोग्यसेवा संस्थेत केलेल्या प्रक्रियेची ही सर्वाधिक संख्या आहे. (kims hospital)

  • रोबोटिक शस्त्रक्रिया

किम्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स हे रोबोटिक शस्त्रक्रियांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या भारतातल्या पहिल्या काही रुग्णालयांपैकी एक आहे. त्यांनी दक्षिण भारतातली पहिली रोबोटिक सुविधा स्थापन केली आहे. २०११ साली त्यांनी भारतातली पहिली रोबोटिक कोलोरेक्टल शस्त्रक्रिया केली होती. याव्यतिरिक्त या रुग्णालयात ऑन्कोलॉजी, स्त्रीरोग, मूत्रविज्ञान आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया केली जाते. (kims hospital)

  • किम्स हॉस्पिटल्सचे उपक्रम

२०१७ साली कार्डिओलॉजी विभागाने १३ वा वार्षिक कार्डिओलॉजी अपडेट उपक्रम आयोजित केला होता. त्यानंतर २०१९ साली ऑर्थोपेडिक विभागाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा इथल्या ऑर्थोपेडिक सर्जनसाठी गुडघा बदलण्याचा अभ्यासक्रम आयोजित केला होता. तसंच २०१९ साली रुग्णालयाने ल्युपस जागरूकता रॅम्प वॉक आणि डीप व्हेन थ्रोम्बोसिस जागरूकता वॉक उपक्रम आयोजित केला होता आणि त्याच वर्षी त्यांनी बालरोगशास्त्रात अस्थिमज्जा प्रत्यारोपणावर एक परिषद देखील आयोजित केली होती. (kims hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.