Kinnaur Kailash : किन्नौर कैलास पर्वतावर आहे ७९ फूट शिवलिंग! जाणून घ्या या पवित्र पर्वताबद्दल अद्भुत गोष्टी

56
Kinnaur Kailash : किन्नौर कैलास पर्वतावर आहे ७९ फूट शिवलिंग! जाणून घ्या या पवित्र पर्वताबद्दल अद्भुत गोष्टी

हिमाचल प्रदेशातल्या तिबेटजवळच्या सीमेजवळ असलेल्या किन्नौर नावाच्या जिल्ह्यामध्ये किन्नौर कैलास नावाचा पर्वत आहे. या पर्वताची उंची जवळपास ६०५० मीटर एवढी आहे. इथे ट्रेकिंग करायला येणाऱ्या पर्यटकांची संख्याही जास्त आहे. हा पर्वत ट्रेकिंगसाठी आव्हानात्मक मानला जातो. हिंदू धार्मिक श्रद्धाळू लोकांच्या मनात या किन्नौर कैलास पर्वताचं महत्त्वाचं स्थान आहे. (Kinnaur Kailash)

किन्नौर कैलासाचं धार्मिक महत्त्व

पंच कैलासांपैकी एक हा किन्नौर कैलास पर्वत मानला जातो. या पर्वताच्या शिखरावर एक स्वयंभू शिवलिंग आहे. लोक खूप श्रद्धेने किन्नौर कैलास परिक्रमा करतात. हिमालय पर्वतरांगा या पुरातन काळापासूनच देवी-देवतांच्या निवासाचं स्थान आहे असं मानलं जातं. (Kinnaur Kailash)

हिमालय पर्वतरांगा हे जगातलं सर्वांत मोठं बर्फाळ क्षेत्र आहे. या पर्वतरांगांचं एकूण क्षेत्रफळ ४५,००० किलोमीटर पेक्षाही जास्त आहे. पवित्र गंगा नदीचा उगमही याच हिमालय पर्वतातून होतो. तसंच अमरनाथचं स्वयंभू शिवलिंग आणि मानसरोवरही याच हिमालय पर्वताच्या शिखरावर आहे. याव्यतिरिक्त देवांची दरी कुल्लू हे ठिकाणही याच पर्वत रांगांमध्ये आहे. कुल्लू येथे ३५० पेक्षा जास्त देवी-देवतांची मंदिरं आहेत. याव्यतिरिक्त बौद्ध भुक्षूही याठिकाणी आपली साधना करण्यासाठी येतात. (Kinnaur Kailash)

हिंदू आणि बौद्धांचे महत्त्वाचे स्थान

या पर्वतावर असलेलं स्वयंभू शिवलिंग १९,८४९ फूट उंचीवर आहे. त्या शिवलिंगाची उंची ७९ फूट इतकी आहे. पूर्वी हे स्थान पर्यटकांसाठी खुलं नव्हतं. पण १९९३ साली ते पर्यटनस्थळ म्हणून खुलं केलं गेलं. हिंदू आणि बौद्ध धर्मीयांसाठी हे स्थान खूप महत्त्वाचं आहे. शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या उद्देशाने भाविक हजारोंच्या संख्येने इथे येतात. (Kinnaur Kailash)

(हेही वाचा – Bhojshala ASI Survey : मध्‍यप्रदेशातील भोजशाळेचे सर्वेक्षण पूर्ण; पुढील सुनावणी ४ जुलैला)

किन्नौर कैलासाकडे पोहोचण्यासाठी पार करावे लागतात हे खिंड

किन्नौर कैलास पर्वताकडे जाण्याचा मार्ग अतिशय अवघड आहे. या पर्वताजवळ पोहोचण्यासाठी दोन खिंडी पार कराव्या लागतात. पहिली म्हणजे लालंती खिंड. ही खिंड १४,५०१ फूट इतक्या उंचीवर आहे. तर दुसऱ्या खिंडीचं नाव आहे चारंग पास. ही खिंड १७,२१८ फूट एवढ्या उंचीवर आहे. (Kinnaur Kailash)

किन्नौर कैलासाच्या प्रदक्षिणेला कल्पा आणि त्रिंग नावाच्या खोऱ्यांतून सुरुवात केली जाते आणि मग पुन्हा सांगला खोऱ्यात ही प्रदक्षिणा पूर्ण होते. भाविक श्रावण महिन्यात या प्रदक्षिणेची सुरुवात करतात. श्रावण महिन्यात शिवतत्वाची पूजा केली जाते. हिंदूंसाठी हा महिना अतिशय पवित्र मानला जातो. कृष्णजन्मोत्सवही याच महिन्यात साजरा केला जातो. (Kinnaur Kailash)

कशा मिळतात सुविधा?

किन्नौर कैलास परिक्रमा करणाऱ्या यात्रेकरूंच्या सुविधेसाठी परिक्रमेच्या वाटेमध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. यांपैकी काही सुविधा सरकारतर्फे असतात तर काही सुविधा खासगी संस्थांतर्फे उपलब्ध करून देण्यात येतात. काही सुविधा मोफत असतात तर काहींचे किरकोळ मोल द्यावे लागते. यात्रेकरूंना आपल्या सोबत कमीतकमी एक स्लीपिंग बॅग आणवीच लागते. (Kinnaur Kailash)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.