आपल्या देशात गाईला गोमाता म्हणून पूजतात. असं म्हणतात की, गायीच्या शरीरात तेहतीस कोटी देवांचा वास असतो. या ठिकाणी तेहतीस ही संख्या नसून प्रकार आहेत. म्हणजेच गाईच्या शरीरात तेहतीस प्रकारच्या देवांचा वास असतो असे म्हणायला हरकत नाही. गायीच्या शरीरातून बाहेर पडलेले पदार्थ फार उपयोगी तसेच औषधीही असतात.
जगभरात वेगवेगळ्या जातींच्या गाई आहेत. त्यांपैकी जर्सी ही विदेशी गाय तर गीर गाय ही देशी मानली जाते. साधारणपणे गाईंची उंची साढेचार ते जास्तीत जास्त पाच फुटांपर्यंत असू शकते. पण आज आम्ही तुम्हाला ज्या गाईबद्दल सांगणार आहोत ती जगातली सर्वात उंच गाय आहे.
(हेही वाचा – आमचं सरकार हे रोजगार देणारं सरकार आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
ही जगातली सर्वात उंच गाय आहे. यापूर्वी 2019 साली सुद्धा ही गाय प्रकाशझोतात आली होती आणि आता पुन्हा सगळीकडे या जगातल्या सर्वात उंच गाईविषयी चर्चा सुरु आहे. या गाईची उंची सहा फूट सहा इंच असून तिचे वजन दीड टन इतके आहे. पश्चिम ऑस्ट्रेलिया येथे राहणाऱ्या ज्योफ पियर्सन नावाच्या एका शेतकऱ्याची ही गाय आहे.
सोशल मीडियावर या गाईचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ही गाय इतर गाईंच्या समूहासोबत उभी आहे. इतर सगळ्या गाईंपेक्षा या गाईची उंची लक्षणीय मोठी आहे. या गाईला पाहण्यासाठी लोकांची लांबच लांब रांग शेतकऱ्याच्या घरी लागत आहे. पत्रकारही शेतकऱ्याला वारंवार फोन करत आहेत.
वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये बायोलॉजीवर रिसर्च करणाऱ्या मिन डू म्हणतात की, या गाईची उंची वाढण्यामागे म्युटेशन सारखे काहीतरी असू शकते ज्याने हार्मोन्स झपाट्याने वाढतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community