Paneer : घरच्या घरी बनवा डेअरीसारखे मलाईदार आणि मऊ पनीर; जाणून घ्या रेसिपी

215
100 gram Paneer Protein: पनीर खाल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात? जाणून घ्या...

पनीर हा भारतीय जेवणाचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. अनेक सण, लग्न समारंभातील जेवणात पनीरची एकतरी रेसिपी असते. पनीरमध्ये भरपूर पौष्टिक मूल्ये असतात. यामुळे पनीर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यासोबतच पनीर हा शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा पुरवठा करण्याचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो.

पनीर कोणत्याही डेअरीतून सहज विकत घेता येते आणि खाता येते. परंतु बरेच लोक घरच्या घरी बनवण्यास प्राधान्य देतात. पण कितीही प्रयत्न करुनही डेअरीसारखे मऊ पनीर घरच्या घरी बनवता येत नाही. यामुळे खाण्यात मज्जा येत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हीही त्यावर उपाय शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला डेअरीसारखे मलाईदार आणि मऊ पनीर घरीच बनवायचे असेल तर खालील टिप्स फॉलो करा.

(हेही वाचा India Alliance : आघाडीत बिघाडी; नवी दिल्लीत काँग्रेसने ‘आप’ला डावलले)

ताज्या दूधाचे दही करून पनीर बनवले जाते. काही लोक उष्णतेमुळे नासलेल्या दुधापासून पनीर बनवण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही पाहिजे तसे पनीर तयार होत नाही. म्हणूनच पनीर बनवण्यासाठी नेहमी ताजे दूध वापरा. तसेच जर तुम्हाला डेअरीसारखे मऊ पनीर बनवायचे असेल तर दुधाला दही करण्यासाठी त्यात ४ ते ५ चमचे लिंबाचा रस वापरावा लागेल. परफेक्ट पनीर बनवण्यासाठी दही किंवा दुधाचे दही इतर कोणत्याही पद्धतीने करणे योग्य ठरत नाही.

मऊ पनीरसाठी दुधात मिसळवा दही

दुधात लिंबू मिसळून त्यापासून अनेक जण मऊ पनीर बनवतात. पण तुम्ही थंड दुधात लिंबाचा रस मिसळवून पनीर बनवत असाल तर ही फार चुकीची पद्धत आहे. दुध उकळल्यानंतर त्यात लिंबू मिसळावे. तसेच लिंबाचा सर्व रस एकाच वेळी मिसळण्याची गरज नाही. दुधात लिंबाचा रस हळूहळू मिक्स करून ढवळत रहा. तुम्हाला ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय आरामात करावी लागेल, कारण यामुळे तुमच्या पनीरचा मऊपणा सुनिश्चित होतो. बहुतेक लोक नासलेले दूध जास्त वेळ शिजवण्याची चूक करतात, अशाने पनीरचा पोत आणि चव खराब होण्याची शक्यता असते. दुधात लिंबाचा रस मिसळल्यानंतर चमचाने ढवळून गॅस बंद करायचा आहे. नंतर वेळ न घालवता एका पातळ स्वच्छ सुती कापडात हे मिश्रण टाका. आता त्याचे एक पोटली बनवा आणि चांगले दाबून पाणी पूर्णपणे काढा. त्यातून सर्व पाणी बाहेर आल्यावर ते जड वस्तूने २-३ तास ​​दाबून ठेवावे. यानंतर डेअरीसारखे मलाईदार मऊ पनीर तयार होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.