कोरफड ही एक औषधी वनस्पती असून, याचा वापर त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी वर्षानुवर्षे केला जातो. केवळ त्वचेसाठी कोरफड गुणकारी नाही तर अनेक आजारांवर कोरफड रामबाण उपाय ठरते. कोरफडीचा वापर लठ्ठपणा कमी करण्यासाठीही केला जातो, याबाबत मात्र अनेक जण अनभिज्ञ आहेत.
कोरफडमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, फाॅलिक अॅसिड, कोलीन, मॅग्नेशियम, जस्त, क्रोमियम, सेलेनियम, सोडियम, लोह आणि मॅगनीज आरोग्यासाठी फार फायदेशीर असते.
असा करा कोरफडीचा वापर
कोरफडीमुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होते. यामुळे तुमचे वजन लवकर कमी होऊ लागते. कोरफडीमुळे शरीर डिटाॅक्स करते. कोरफड शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून, वजन कमी करण्यास मदत करते. तुम्हीही याचा वापर करुन वजन कमी करु शकता. कोरफडीची पाने तोडून त्याच्या आतील गर मिक्सरमध्ये वाटून घ्या. यामुळे त्याची जेलप्रमाणे पेस्ट होईल. ती पेस्ट सकाळी खा.
( हेही वाचा: पाकिटात ११ किंवा १००१ असेच का दिले जातात? ही आहेत त्या वरच्या 1 रुपयामागची कारणे )
वजन कमी होण्यास मदत
जेवणापूर्वी कोरफडीचा रस प्यायल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. यासाठी जेवणाच्या 20 मिनिटे आधी एक चमचा कोरफडीचा रस घेतल्याने पचनक्रिया सुधारते आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरात साठलेली चरबी जलद कमी होण्यास मदत होते. कोरफडमध्ये व्हिटॅमिन बी असते हे चरबी विरघळवून त्याचे उर्जेमध्ये रुपांतर करण्याचे काम करते. दोन आठवडे याचा वापर केल्यानंतर, तुम्हाला नक्की फरक दिसून येईल.
Join Our WhatsApp Community