चालणे आरोग्यदायी असते, असे आपण नेहमीच ऐकतो. शारीरिका आणि मानसिक आरोग्य टिकून राहण्यासाठी चालल्याने अनेक फायदे होतात याविषयी वैद्यकशास्त्रात विविध प्रकारचे फायदे सांगण्यात आले आहेत.हल्ली सायलेंट वॉकिंग नावाचा एक नवीन ट्रेंड सुरू आहे.सायलेंट वॉक करताना कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम आवाजापासून दूर राहावे लागते.
टिक टॉक इन्फ्लुएन्सर मॅडी माओने 30 मिनिटे चालत असताना एक साधा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामुळे सायलेंट वॉकचा ट्रेंडच आपल्याकडे सुरू झाला. यामध्ये 30 मिनिटे न बोलता चालणे आवश्यक आहे. या वेळेत गजबजाट किंवा तुमचे लक्ष विचलित करणार्या ठिकाणांपासून दूर एक शांत जागा निवडणे आवश्यक आहे. या वेळेत तुम्ही शांतपणे चालत राहणे आवश्यक आहे. शांतपणे हळुवार पाऊले टाकत चालल्याने विचार करण्यासाठी, स्वतःला शारीरिक आणि मानसिक वेळ देण्यासाठी मुख्य म्हणजे सर्जनशील विचारांना प्रोत्साहन देण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो.
सायलेंट वॉकिंगचे फायदे
– द नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, निसर्गात फक्त ९० मिनिटे शांतपणे चालल्याने ताणतणाव कमी व्हायला मदत होते. यामुळे मानसिक आजाराशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.
– संशोधकांच्या मते, TikTok द्वारे व्हायरल केलेल्या या ट्रेंडद्वारे, अनेकांनी स्वतःला आनंदी ठेवण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेतले. शांतपणे चालणे हे एक प्रकारचे ध्यान आहे. जे काही मिनिटांत ताणतणाव दूर करायला फायदेशीर ठरू शकते. बाहेरील आवाजामुळे मेंदू किंवा शरीरात तणावाचे संप्रेरक वाढू शकतात, ज्यामुळे ताणतणाव वाढतो. अशावेळी जर तुम्ही शांतपणे चालत असाल तर त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य पूर्णपणे सुधारायला मदत होते.
– सायलेंट वॉकिंगमुळे तुम्हाला स्वत:विषयी विचार करायला वेळ मिळू शकतो.