खोताचीवाडी (Khotachiwadi) हे मुंबईतील गिरगाव येथे असलेले एक आकर्षक गाव आहे. या गावाची स्थापना १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात खोत नावाच्या पाठारे प्रभू समाजातील लोकांनी केली होती. हा समाज म्हणजे मुंबईचे मूलनिवासी. हे गाव त्याच्या अनोख्या इंडो-पोर्तुगीज वास्तुकौशल्यासाठी ओळखले जाते, ज्यामध्ये कमी उंचीची, उच्च घनता असलेली घरे, चाळी आणि अपार्टमेंट इमारती आहेत.
या गावाचं नाव पडलं वामन हरी खोत यांच्या नावावरून… वामन हरी खोत यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जमिनीचे तुकडे पाडले आणि भारतीय ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांना वेगवेगळे भूखंड दिले. मलबार हिल्सच्या पायथ्याशी वसलेले गिरगाव हे मुळात मासेमारी करणार्यांचे गाव (Khotachiwadi). ज्यामध्ये कोळी व पाठारे प्रभू समाजाचे लोक राहत होते. ते मूळचे मुंबईचे रहिवासी होते.
(हेही वाचा – dhanteras special rangoli design : धनत्रयोदशीच्या दिवशी कोणती रांगोळी काढाल?)
या गावाचं सौंदर्य त्याच्या वास्तुशैलीतून दिसून येतं. या गावातील घरे साधारणपणे जुन्या पोर्तुगीज वास्तुशैलीशी सुसंगत आहेत. येथील प्रत्येक घर रंगीबेरंगी आहे. ही घरे पाहिली की डोळ्यांत साठवून ठेवावीशी वाटतात. पूर्वी येथे ६५ घरे होती, मात्र आता त्यांची संख्या २८ झाली आहे. याचं कारण इथे नव्या गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत.
खोताची वाडी हा एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा देखील आहे. जुन्या मुंबईची आठवण करुन देणारं आहे. अनेक परदेशी लोक रोज येथे येतात आणि येथील घरांसमोर उभे राहून त्यांचे फोटो काढतात. येथील बहुतांश रहिवासी आता मुंबईतील मूळ रहिवाशांचे वंशज आहेत, अशी मान्यता आहे. (Khotachiwadi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community