विमान तिकीट असे मिळवा स्वस्तात

अलिकडे अनेकजण विमानाने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. त्याने वेळ फार वाचतो. पण विमानाचे तिकीट काही युक्त्या वापरुन बुक केल्यास, रेल्वेइतके ते स्वस्त पडू शकते हे तुम्हाला माहिती आहे का?

या आहेत काही टिप्स

  • विमानांची तिकिटे ब-याचदा मध्यरात्रीच्या वेळी स्वस्त असतात, त्यातही सोमवार, मंगळवार आणि बुधवारच्या रात्री विमानांच्या तिकीटांवर ब-याच सवलती असतात.
  • शक्य असेल तर आपल्या प्रवासाच्या तारखा आधीच बुक करुन ठेवू नका. ज्या दिवशी विमानांची तिकीटे स्वस्त असतील, त्यानुसार आपल्या प्रवासाचे प्लॅनिंग करा. विशेषत: मंगळवारी आणि वीक डेजला तिकिटे स्वस्त असतात; पण प्रत्येक वेळी तसे असेलच असे नाही, म्हणून संपूर्ण महिन्यात कधी प्रवास भाडे कमी आहे, ते चेक करा आणि आपले पैसे वाचवा.
  • शक्यताे लोकल एअरलाइन्सचे पर्याय दाखवतच नाहीत. त्यासाठी गुगलचा वापर करा.
  • सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमानांच्या तिकिटांचे भाडे सर्च करताना प्रत्येक वेळी आपल्या ब्राऊझरमधील कुकीज आधी डिलिट करा, म्हणजे त्यात आपली हिस्ट्री सेव्ह होणार नाही. नाहीतर तुम्ही गरजू प्रवासी आहात, हे ओळखून वेबसाइट प्रत्येक सर्चला तुम्हाला वाढीव भाडे दाखवत राहील.
  • भारतीय रुपयांत तिकिट बुक करण्याऐवजी कोणत्या देशाच्या चलनात तिकिट स्वस्त पडते ते बघा आणि मग तिकीट बुक करा.
  • प्रवासाच्या ब-याच आधी तिकिटे बुक करा.

( हेही वाचा: गुजरातमध्ये मोठी दुर्घटना! कारखान्याची भिंत कोसळून 12 जणांचा मृत्यू )

  • फेअर अलर्ट्स सेव्ह करुन ठेवले, तर स्वस्त डिल्स, ऑफर्स कायम तुमच्या समोर येत राहतील.
  • कुठे जायचे, हे नक्की नसेल, तर प्रवासासाठी स्वस्त आणि उत्तम ठिकाण कोणते आहे, हे आधी निवडा आणि त्यानुसार प्लॅनिंग करा.
  • तुम्ही जर एखाद्या कंपनीचे निष्ठावान प्रवासी असाल, तर त्यांच्या माइल्स पाॅइंट्सचा लाभ घ्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here