मोबाईल हरवला किंवा चोरीला गेलाय? तातडीने करा ‘या’ गोष्टी

आजच्या काळात स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. फोनशिवाय काही काळ जगणे कठीण होऊन बसले आहे. तसेच, सध्या ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अशा वेळी मोबाईलचा डेटा तसेच,  मोबाईल चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत. डेटा चोरीपासून वाचण्यासाठी तुम्ही या काही टिप्स फाॅलो करा.

सिमकार्ड त्वरित ब्लॉक करा (Phone Lock)

स्मार्टफोन हरवल्यास त्वरित सिमकार्ड ब्लॉक करा. जेणेकरून फोन चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेला असेल आणि तुमच्या बँक तपशीलाशी छेडछाड केली जात असेल, तर सिमवरुन कोणताही ओटीपी पोहोचणार नाही. नंतर, तुम्ही तोच नंबर नवीन सिममध्ये सक्रिय करू शकता. यासाठी टेलिकॉम कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करून मदत मिळवू शकतात.

( हेही वाचा: National Girl Child Day : मुलीच्या भविष्याची चिंता आहे? ‘या’ सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवा सर्वाधिक फायदा )

जीपीएसच्या माध्यमातून फोन टॅक करा (GPS Phone Tracking)

फोन हरवल्यानंतर जीपीएसच्या माध्यमातून तुम्ही फोन ट्रक करु शकता. यासाठी फोनमधील इनबिल्ड जीपीएस सिस्टीम ऑन असणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या अ‍ॅण्ड्रॉइड डिव्हाइसमध्ये होणाऱ्या प्रत्येक अ‍ॅक्टीव्हीटीवर लक्ष ठेवता येणार आहे.

मोबईलमधील बॅंकिग खाती ब्लॉक करा

लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही फोनच्या मदतीने हरवलेल्या फोनमधील बँक खाती ब्लॉक करा. तसेच आपण बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करूनदेखील खाते बंद करू शकता. जेणेकरून कोणीही तुमच्या खात्याचा गैरवापर करून आर्थिक व्यवहार करु शकणार नाही.

इतर अॅपची मदत घेऊ शकता

वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून हरवलेल्या फोनचा शोध घेऊ शकता. जसे अॅन्टी थेफ्ट अलार्म अॅप डाऊनलोड करुन तो अॅक्टीव्ह करा. अॅक्टीव्हेट केल्यानंतर तुमच्या फोनला कोणी अनोळखी व्यक्तीस हात लावल्यास अलार्म वाजेल. तसेच थीफ टॅकर या अॅपमध्ये काही खास फिचर आहेत. या अॅपच्या मदतीने फोन चोरी करणा-या व्यक्तीचा शोध घेता येईल.

पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करा

जर तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल किंवा कुठेतरी हरवला असेल तर त्वरीत तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा. जेणेकरून कोणी मोबाईलमधील डेटा वापरुन गैरवापर करत असेल तर तुमचे नुकसान होणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here