घरी बसून ‘अशी’ करा विदेशात गुंतवणूक!

बहुराष्ट्रीय कंपन्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतात. घरी बसून विदेशी कंपन्यांत गुंतवणूक करण्यासाठी एमएनसी फंड हा चांगला पर्याय आहे. आपल्या देशाप्रमाणेच इतर देशांतही व्यवसाय करणा-या या कंपन्या आहेत. यात अधिक परताव्याची शक्यता असते. मागील तीन वर्षांत या फंडांनी सरासरी वार्षिक 12 टक्के परतावा दिला आहे.

फंडांची वैशिष्ट्ये

कुठे करावी गुंतवणूक ?

एमएनसी फंडांची गुतंवणूक असलेल्या क्षेत्रांत मागील काही महिन्यांत तेजी असल्याचे दिसून आले. बाजारतज्ज्ञ हर्ष उपाध्याय यांनी म्हटले की, मी एफएमसीजी इंडस्ट्रियल्स, इंजिनिअरिंग, ऑटो अॅन्सिलिअरी कंपन्यांचे अधिक समभाग खरेदी केले आहेत. यात तेजी आहे.

…म्हणून आहे उत्तम

एमएनसी फंडांत गुंतवणुकीमुळे उत्तम कंपन्यांत गुंतवणूकदारांस मिळते. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वहीखाते आणि व्यवस्थापन मजबूत असते. जगभरातील अनुभव पाठीशी असल्यामुळे चढ- उतार झेलण्याची त्यांची क्षमता चांगली असते.

गुंतवणूक करायला हवी का ?

संकल्पनाधिष्ठित असूनही एमएनसी फंडांनी चढ- उताराच्या स्थितीतही चांगला परतावा दिला असल्याचे दिसूल आले आहे. एसआयपीच्या माध्यामातून या फंडात गुंतवणूक करणे लाभदायक ठरु शकते. सात वर्षांपर्यंत गुंतवणूक असायला हवी. यात तुम्ही तुमच्या एकूण पोर्टफोलिओच्या 10 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करु शकता.

परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक कशी कराल?

  • परदेशातील गुंतवणूकीचे खाते आपल्या देशातील ब्रोकरमार्फत उघडून याद्वारे व्यवहार करता येईल.
  • विदेशी बाजारात गुंतवणूक करणा-या म्युच्युअल फंडांमध्ये युनिट खरेदी करणे.
  • प्रत्यक्ष शेअर बाजारात गुंतवणूक न करता देशी, परदेशी ब्रोकर्सकडून ईटीएफ घेणे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here