Airtel आणि Jio या दोन खासगी टेलिकाॅम कंपन्यांनी ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात निवडक शहरांत आपली 5G सेवा लाॅन्च केली आहे. या शहरांतील अनेकांना 5G नेटवर्क येत नाही. यामुळे ते त्रस्त आहेत. तर अनेकजण जिओ टू एअरटेल स्वीचदेखील करण्याच्या विचारत आहेत. असे असले तरी जिओ घ्यायचे की एअरटेल, कोणाचे नेट फास्ट असणार ते पाहूया.
Airtel आणि Jio खरंतर वेगवेगळ्या टेक्नाॅलाॅजीवर काम करतात. तसेच दोन्ही कंपन्या वेगवेगळे बॅंड वापरतात. जिओकडे जो 700MHz चा स्पेक्ट्रम आहे, तो संथ म्हटला जातो. या दोन्ही बॅंडमुळे शहर आणि गाव आदी भाग नीट कव्हर होऊ शकतो. विशेषत: जिओ दाटीवाटीच्या भागात जिथे भिंतीला भिंती चिकटलेल्या आहेत. मोठी गर्दी आहे तिथे जिओची रेंज चांगली मिळणार आहे. यामुळे जिओला भविष्यात 4Gची गरज लागणार नाही.
( हेही वाचा: McDonald मध्ये खरेदी केलेला एक बर्गर तुमच्या पुढच्या पिढीची करणार हत्या- शरद पोंक्षे )
या समस्या जाणवू शकतात
एअरटेलचे तसे नाही, एअरटेलने जे बॅंड घेतले आहेत, ते जास्त फ्रिक्वेन्सीचे आहेत. यामुळे एअरटेलने जिओपेक्षा अधिक पैसा खर्च केला आहे. हे हाय फ्रिक्वेन्सी बॅंड असल्याने त्यांची रेंजही कमीच असणार आहे. यामुळे ते दाटीवाटीच्या शहरांत जास्त परिणामकारक काम करु शकत नाहीत. यासाठी एअरटेलला एकतर जवळजवळ टाॅवर उभारावे लागतील किंवा त्यांना 4Gची सेवादेखील वापरावी लागेल. यामुळे एअरटेलचे प्लॅन जिओपेक्षा पर्यायाने महाग किंवा कमी ऑफरचे जसे की किंमत तेवढीच परंतु कमी डेटा आदीचे असू शकतात. तसेच काॅल ड्राॅपची समस्यादेखील जाणवू शकते.
आता तरी दोन्ही नेटवर्क वापरणा-यांकडून स्पीड असल्याचे सांगितले जात असले तरी हे सगळे यूजर काही हजारांत लाखात आहेत. अद्याप फूल फोर्सने युजरनेही वापर सुरू केलेला नाही आणि नेटवर्कही कार्यान्वित झालेले नाही. या सर्व गोष्टी त्या-त्या भागातील बॅंड, युजरची संख्या तेथील भौगोलिक परिस्थिती, दाटीवाटी, इमारती आदींवर अवलंबून आहेत. यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या नेटवर्कचे खरे रुप त्यांनी रिचार्ज प्लॅन्स जाहीर केले की समोर येणार आहे. सध्यातरी दोन्ही कंपन्यांचे ग्राहक 5Gची वाट पाहत आहेत.
Join Our WhatsApp Community