Dachigam National Park मध्ये काय काय प्रसिद्ध आहे?

47
Dachigam National Park मध्ये काय काय प्रसिद्ध आहे?

दाचीगाम नॅशनल पार्क (Dachigam National Park) हे काश्मीरमधल्या श्रीनगर जिल्ह्यांतर्गत येणारं एक अभयारण्य आहे. हे नॅशनल पार्क श्रीनगर शहरापासून २२ किलोमीटर म्हणजेच १४ मैल एवढ्या अंतरावर दल सरोवराच्या पूर्वेला आहे. या नॅशनल पार्कचं क्षेत्रफळ १४१ चौरस किलोमीटर एवढं आहे.

या नॅशनल पार्कची निर्मिती करण्यासाठी इथे असणाऱ्या दहा गावांना या ठिकाणाहून स्थलांतरित केलं गेलं. म्हणून ‘दाचीगाम’ (Dachigam National Park) असं या नॅशनल पार्कचं नाव ठेवण्यात आलं. या नॅशनल पार्कचं मुख्य गेटचं प्रवेशद्वार दारुल उलूम कौसारियाच्या दोन्ही बाजूला नवीन थीड जनरल बस स्टँडच्या अगदी जवळ आहे.

हे पार्क १९१० सालापासून संरक्षित क्षेत्र आहे. सुरुवातीला हे क्षेत्र जम्मू आणि काश्मीरच्या महाराजांच्या देखरेखीखाली आणि नंतर संबंधित सरकारी अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली होतं. श्रीनगरला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्यवस्थित व्हावा या हेतूने हे क्षेत्र तयार केलं गेलं. पण १९८१ साली या क्षेत्राची श्रेणी सुधारुन याला नॅशनल पार्क घोषित करण्यात आलं.

(हेही वाचा – Mahindra Finance : ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना कर्ज देण्यापासून सुरूवात झालेली कंपनी कशी पोहोचली स्वत:च्या म्युच्युअल फंडापर्यंत )

भौगोलिक स्थिती

दाचीगाम नॅशनल पार्क (Dachigam National Park) हे पश्चिम हिमालयाच्या झाबरवन पर्वतरांगेमध्ये वसलेलं आहे.

हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे १६०० मीटर ते ४२०० मीटर पर्यंत उंच आहे.

नॅशनल पार्कच्या आतल्या भागात मार्सार नावाचं सरोवर आहे. या सरोवराजवळून डगवान नावाची नदी वाहते. ही नदी श्रीनगरला पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या सरबंद जलाशयाला पाण्याचा पुरवठा करते. त्यानंतर डगवान नदी ही झेलमवरुन वाहते.

वनस्पती

या नॅशनल पार्कमध्ये (Dachigam National Park)  बहुतेक शंकूच्या आकाराच्या विस्तृत पानांच्या प्रजाती असलेली वृक्षसंपदा आहे. यांमध्ये आल्पाइनची कुरणं, धबधबे आणि खोल दऱ्यांमध्ये असलेल्या वनस्पती आहेत. या वनस्पतींना स्थानिक भाषेमध्ये नार्स असं म्हणतात. कडक हिवाळा वगळला तर बहुतेक गवताळ प्रदेश आणि कुरणं हे रंगीत फुलांनी मढलेले असतात.

(हेही वाचा – Vishrambaug Wada : काय आहे विश्रामबाग वाड्याचा इतिहास?)

प्राणी-पक्षी

हंगुल म्हणजेच काश्मीर हरिण हे दाचीगाम येथे प्रामुख्याने आढळतात. याव्यतिरिक्त दाचीगाम नॅशनल पार्क येथे आढळून येणाऱ्या प्राणी आणि पक्षांची नावं पुढीलप्रमाणे आहेत:-

प्राणी

●कस्तुरी मृग (रुझ कॅट)
●हिम बिबट्या
●हिमालयीन सेरो
●काश्मीरी ग्रे लंगूर
●काश्मीर स्टॅग (हंगुल)
●बिबट्या मांजर
●काळा अस्वल
●तपकिरी अस्वल
●कोल्हा
●मुंगूस
●पिवळ्या गळ्याचा मार्टेन
●रानटी मांजर
●लांब शेपटीचा मार्मोट
●ओटर

(हेही वाचा – Tirupati Laddu: तिरुपती लाडूच्या वादानंतर आता जगन्नाथ पुरी मंदिराने घेतला मोठा निर्णय!)

पक्षी

●दालचिनी चिमणी
●काळा बुलबुल
●हिमालयीन मोनल
●गोल्डन ओरिओल
●मिनिव्हेट
●पिग्मी घुबड
●वुडपेकर
●बॅब्लर
●रेडस्टार्ट
●वॅगटेल
●कोकलास फीसॅन्ट
●काल्फ
●ऑरेंज बुलफिंच
●काशमिरी फ्लायकॅचर
●टायटलर्स लीफ वार्बलर
●स्ट्रेक्ड लाफिंगथ्रूश
●रुबीथ्रोट
●वॉलक्रीपर
●ब्लॅक-येल्लो ग्रॉसबीक
●ग्रिफॉन गिधाड
●बियर्डेड गिधाड
●रेड-बिल्ड ब्लू मॅग्पी
●टिटमाऊस इत्यादी. (Dachigam National Park)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.