jivdhan fort वर गेल्यावर काय काय कराल आणि काय काय पाहाल?

58
jivdhan fort वर गेल्यावर काय काय कराल आणि काय काय पाहाल?

महाराष्ट्र राज्यात नाणेघाटापासून २ किलोमीटर एवढ्या अंतरावर आणि माळशेज घाटापासून ३२ किलोमीटर एवढ्या अंतरावर वसलेला ‘जीवधन किल्ला’ (jivdhan fort) हा महाराष्ट्रातल्या माळशेजच्या जवळ असलेला एक डोंगरी किल्ला आहे. नाणेघाटाच्या जवळ वसलेला हा किल्ला माळशेज घाटात असून, महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे. तसंच हा जीवधन किल्ला म्हणजे पुण्याजवळ असलेल्या लोकप्रिय ट्रेकिंगच्या ठिकाणांपैकी एक आहे.

महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये सुमारे ३,७५७ फूट एवढ्या उंचीवर असलेला हा जीवधन किल्ला (jivdhan fort) पुण्याजवळ असलेल्या प्रसिद्ध पाच किल्ल्यांचा एक भाग आहे. त्यांपैकी चावंड, हडसर, शिवनेरी आणि नाणेघाट हे इतर चार किल्ले आहेत. ऐतिहासिक नोंदणीनुसार जीवधन किल्ला हा सातवाहन काळातला आहे. हा किल्ला नाणेघाटाच्या जवळ असल्यामुळे हा किल्ला एक महत्त्वाचा किल्ला ठरला आहे. मार्ग आणि मोक्याची ठिकाणं राज्याच्या दृष्टीने महत्वाची होती त्या अनेक मार्गांचं आणि त्या ठिकाणांचं रक्षण करणं या जीवधन किल्ल्यामुळेच शक्य झालं होतं.

(हेही वाचा – New Year 2025 : वरळी, लोअर परेल आणि महालक्ष्मी भागांतील पब, रेस्टोबार, रेस्टॉरंटची झाडाझडती; ६ रेस्टॉरंटवर कारवाई)

अहमदनगरच्या आदिलशाहीचा शेवटचा शासक मुर्तझा याला मुघलांनी जीवधन किल्ल्यावर (jivdhan fort) कैद केलं होतं. १६३५ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी त्याची तुरुंगातून सुटका केली आणि त्याला अहमदनगरचा राजा म्हणून घोषित केलं. १८१५ ते १८१८ या काळामध्ये इंग्रजांनी जीवधन किल्ल्याला वेढा घातला आणि किल्ला तोडून लुटला.

जीवधन किल्ल्याची तटबंदी पूर्णपणे ढासळली आहे. त्यामुळे किल्ल्यावर असलेली धान्य साठवण्यासाठी वापरली जाणारी मोठी कोठी दिसते. या कोठी व्यतिरिक्त जीवधन किल्ल्यावर असलेली पाण्याची टाकी आणि देवी जिवाईचं मंदिर आहे. आई जिवाई ही किल्ल्याची संरक्षक देवता आहे. या जीवधन गडाचा उत्तर दिशेकडचा बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. या बुरुजाजवळ काही टाके आणि जुन्या इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात. या ठिकाणाहून जवळच असलेल्या नाणेघाट किल्ला, हरिश्चंद्र गड, हडसर गड, चावंड गड आणि रतनगड या किल्ल्यांचं मनमोहक दृश्य पाहायला मिळतं. जीवधन किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे वानरलिंगी शिखराचं चित्तथरारक दृश्य पाहायला मिळतं. हा शिखर दुरून लहान दिसत असला तरी गडाच्या (jivdhan fort) माथ्याजवळ गेल्यावर मोठा दिसायला लागतो.

(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची ऑस्ट्रेलियात रेकॉर्ड-तोड कामगिरी, आयसीसी पुरस्कारासाठीही नामांकन)

जीवधन किल्ल्याच्या (jivdhan fort) माथ्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. तुम्ही नाणेघाट मार्गाने जाऊ शकता किंवा घाटघर मार्गानेही जाऊ शकता. नाणेघाटचा मार्ग हा फक्त अनुभवी ट्रेकर्ससाठी योग्य आहे. कारण तो मार्ग बराच आव्हानात्मक आहे. हा मार्ग घनदाट जंगलातून जातो. या मार्गावर गुंतागुंतीची पायवाट असल्यामुळे जंगलात हरवण्याची शक्यता आहे. या मार्गाने किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. तर घाटघर मार्गावर अनेक खडकाळ पॅच असले तरीही नाणेघाट मार्गाच्या तुलनेने हा पाच किलोमीटरचा ट्रेक मार्ग बराच सोपा आहे. या वाटेवर एका ठराविक टप्प्यानंतर दगडी पायऱ्या आहेत.

या दगडी पायऱ्या किल्ल्याच्या (jivdhan fort) कल्याण दरवाजाकडे घेऊन जातात. इथे चढताना सावधगिरी बाळगायला हवी. कारण पावसाळ्यात या पायऱ्या निसरड्या होऊ शकतात. तरी खडक कापलेल्या पायऱ्यांच्या बाजूने भिंतींना आश्वासक अशा आकड्या जोडल्यामुळे या पायऱ्यांवरून चढण करणं सोपं जातं. तुम्ही या किल्ल्यावर जाण्यासाठी कोणता मार्ग निवडता हे महत्त्वाचं नाही, तर जीवधन किल्ल्याच्या माथ्यावर जाणारा योग्य मार्ग दाखवण्यासाठी तुम्ही मार्गदर्शक सोबत घेणं जास्त महत्त्वाचं आहे.

(हेही वाचा – Suresh Dhas Apologies Prajakta Mali आमदार सुरेश धस यांनी मागितली प्राजक्ता माळीची माफी)

जीवधन किल्ल्यावर (jivdhan fort) तुम्ही केव्हाही जाऊ शकता. किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला ओळखपत्र दाखवावं लागेल. तसंच परदेशी नागरिकांसाठी पासपोर्ट दाखवणं अनिवार्य आहे. कॅम्पिंगचं विचार करत असाल तर कोठी हे राहण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. तुमच्याकडे जर तंबू नसेल तर ८ ते १० लोक या कोठीमध्ये राहू शकतात. तसंच तुमच्याकडे तंबू असेल तर वारा कमी असलेल्या ठिकाणी तुम्ही तुमची शिबिराची जागा ठरवू शकता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.