manori beach वर गेल्यावर काय काय धम्माल कराल?

102
manori beach वर गेल्यावर काय काय धम्माल कराल?

मनोरी हे एक लहानसं गाव आहे. या गावातल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी हा आहे. हे गाव मुंबईच्या उत्तर भागात वसलेलं आहे. हे गाव इथल्या बीचसाठी (manori beach) आणि मनोरी खाडीसाठी प्रसिद्ध आहे. मनोरी हे ‘मिनी-गोवा’ म्हणूनही ओळखलं जातं. मनोरी येथे अस्सल सीफूड आणि समुद्रकिनारी मिळणाऱ्या बीच-साईड फूडसाठी प्रसिद्ध आहे. इथून तुम्हाला फेरीने मालाड मार्वेला पाच मिनिटांत पोहोचता येतं.

मुंबईतल्या वीकेंडर्सचे ताफे दर आठवड्याला मनोरी बीचला भेट देतात. मनोरी बीचवर सहसा गर्दी असते. मनोरी येथे दोन रिसॉर्ट्स आहेत. या रिसॉर्ट्सची रचना स्पॅनिश व्हिलासारखी केलेली आहे. याव्यतिरिक्त इथे इतर अनेक हॉटेल्स आणि निवास सुविधा आहेत. मनोरी हे गाव तिथल्या सुंदर परिसरामुळे आणि कमी रहदारीमुळे सायकलस्वारी करण्यासाठीही प्रसिद्ध आहे.

मनोरी गावचा समुद्रकिनारा काजूची झाडं आणि हिरवळीने व्यापलेला आहे. मनोरी बीचवरच्या खडकाळ टेकड्यांवर बसून सुंदर सूर्यास्ताचा आनंद घेण्याची मज्जा काही औरच आहे. मनोरी बीच (manori beach) जवळ एस्सेल वर्ल्ड आणि गोराई बीच यांसारखी काही इतर पर्यटनस्थळे देखील आहेत.

(हेही वाचा – almora : अलमोडा हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे?)

मनोरी बीच जवळची आणखी पर्यटनस्थळे

मनोरी हे मुंबईच्या उत्तर उपनगर बेटावरच्या काही स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. हे बीच गोराई बीच आणि उत्तन बीचला लागून आहे. इथे शिवमंदिर आणि नाथ संप्रदायाच्या अध्यात्मिक गुरुंचे दोन आश्रम- स्वामी गगनगिरी महाराज आणि त्यांचे शिष्य स्वामी गगन आनंद महाराज यासारखी काही खास स्थळं जवळपास आहेत.

मनोरी बीचला भेट देण्यासाठी उत्तम वेळ कोणती?

मनोरी समुद्रकिनारा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. या बीचला (manori beach) वर्षभर पर्यटक भेट देत असतात. तरी मनोरी बीचला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च हा आहे. कारण या काळामध्ये मुंबईतलं हवामान कमी दमट असतं.

(हेही वाचा – Rahul Gandhi यांचा देशात पुन्हा वादंग माजवण्याचा कट; अमेरिकेत इल्हान उमरची घेतली भेट)

मनोरी बीचला भेट देण्याआधी काही टिप्स
  • मनोरी जवळ कोणतेही एटीएम नाहीय त्यामुळे तुमच्यासोबत नेहमी कॅश बाळगा. जरी तुम्हाला जवळपास एटीएम सापडलं, तरीही त्यात पैसे नसतील.
  • मनोरी बीचजवळ पार्किंगसाठी पुरेशी जागा आहे.
  • या बीचवर (manori beach) तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ऍडव्हेंचर राइड्स करता येणार नाहीत. म्हणून जर तुम्ही ऍडव्हेंचरच्या शोधात असाल तर मुंबईतल्या इतर बीचवर जाऊ शकता.
मनोरी बीचवर कसं जायचं?

मनोरी बीच (manori beach) हे छत्रपती शिवाजी विमानतळापासून १९ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तिथून तुम्ही सहज कॅब किंवा ऑटो भाड्याने घेऊन येऊ शकता. या व्यतिरिक्त बसेसही उपलब्ध आहेत किंवा रेल्वेनेही इथे पोहोचू शकता. बोरिवली हे मनोरीच्या सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन बीचपासून ७ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.

याव्यतिरिक्त मनोरीला पोहोचण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे आपलं खाजगी वाहन होय. कारण सार्वजनिक वाहतूक येथे थोडीशी विरळच आहे. हे गाव भाईंदर आणि दहिसर चेक नाका मार्गे रस्त्याने जोडलेले आहे. सागरी मार्गानेही तुम्ही इथे पोहोचू शकता. हा मार्ग तुलनेने लहानही आहे. मालाड रेल्वे स्टेशन इथल्या मार्वे बीचपासून मनोरी बीच हे फक्त १५ मिनिटांच्या फेरीच्या अंतरावर आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.