१ जानेवारी १८४८ साली सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी पुण्यातल्या बुधवार पेठ येथे तात्यासाहेब भिडे या ब्राह्मण सदगृहस्थांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली इंग्रजी शिक्षणानुसार शाळा सुरू केली, असे म्हटले जाते. बुधवार पेठेतला हा भिडे वाडा (bhide wada) पुण्यातल्या सर्वांत जुन्या असलेल्या अनेक पारंपारिक घरांपैकी एक आहे. पुण्यामध्ये अशा अनेक वास्तू १८व्या शतकात बांधल्या गेल्या. त्यावेळी पुणे शहर ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे शिलेदार पेशव्यांची राजधानी होती.
सर्वांत सामान्य वाडे हे दोन मजली उंच आणि आयताकृती मांडणीचे होते. या वाड्यांमध्ये दोन मध्यवर्ती अंगणे होती आणि त्यांच्या सभोवताली आठ खोल्या होत्या. याव्यतिरिक्त एक विहीर आणि सामान्य शौचालयाची सुविधाही होती. अशा वाड्यांमध्ये विस्तारित कुटुंबाचे अनेक सदस्य आणि कधीकधी अगदी जवळचे मित्रही एकत्र राहायचे. पेशवे आणि इतर उच्चवर्गीय नागरिक हे अशा वाड्यांचा वापर राहण्यासाठी म्हणून करायचे. कार्यालये म्हणूनही हे वाडे वापरले जायचे.
(हेही वाचा – Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : गडचिरोलीत 111 वर्षाच्या आजीने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन केले मतदान!)
त्यातल्याच एका भिडे वाड्यातल्या (bhide wada) अंगणापासून एका सामाजिक चळवळीला सुरुवात झाली. कारण हा वाडा म्हणजे स्त्री-पुरुषांसाठी एकत्र बैठकीचे ठिकाण म्हणून काम करत होता. या वाड्यात मुलींची इंग्रजी पद्धतीच्या शिक्षणातली पहिली शाळा सुरू करण्यात आली होती.
सावित्रीबाई फुले नऊ वर्षांच्या असताना त्यांचं लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी झालं. त्यावेळी ज्योतिराव फुले हे १३ वर्षांचे होते. त्याकाळी मुलींना इंग्रजी पद्धतीनुसार शिक्षण दिलं जात नसे. पण तरीही त्यांच्या पतींनी त्यांना स्वतः घरी शिकवलं. सावित्रीबाईंनी ज्योतिरावांकडून प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर आणखी दोन शिक्षकांकडून त्यांनी शिक्षिकेचा अभ्यासक्रम शिकून घेतला. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षिका आणि मुख्याध्यापिका बनणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community