आरे मिल्क कॉलनी (aarey colony) ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचाच एक भाग असलेलं जंगल आहे. हे जंगल जवळपास दोन हजार एकर एवढ्या भागावर पसरलेलं आहे. ३ सप्टेंबर २०२० साली आरे कॉलनीचं अंदाजे सहाशे एकर क्षेत्रफळाचा भाग राखीव जंगल म्हणून घोषित केला गेला आहे. आरे कॉलनी हा मुंबईच्या उपनगरातला गोरेगाव पूर्व इथला परिसर आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या प्रोसेसिंग आणि मार्केटिंगला वाव मिळावा म्हणून १९४९ साली आरे मिल्क कॉलनीची स्थापना करण्यात आली होती.
(हेही वाचा – लाडकी बहीण योजनेमुळे Mahayuti सुसाट; महाआघाडी मात्र संभ्रमात)
आरे कॉलनीतले वनस्पती आणि प्राणी
आरे कॉलनीमध्ये (aarey colony) वनस्पतींच्या कमीतकमी ८६ प्रजाती आहेत. तर २२ प्रजातीचे पक्षी इथे पाहायला मिळतात. याव्यतिरिक्त इथे वन्यजीवांच्या २९० प्रजाती आहेत. त्यांमध्ये बिबट्या, बुरसटी मांजर, माकडे, सांबर हरीण, अलेक्झांड्रिन पॅराकीट आणि रेड-वॉट लड लॅपविंग यांचा समावेश आहे.
आरे मिल्क कॉलनीमध्ये (aarey colony) फुलपाखरांच्याही ९० प्रजाती असल्याचं आढळून आलं आहे. याव्यतिरिक्त इथे ८ सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती, १२ उभयचर प्राण्यांच्या प्रजाती आणि ७७ वेगवेगळ्या प्राणी आणि पक्षांच्या प्रजाती अस्तित्वात आहेत. तसंच ६ मोस्नाव्हेनोच्या प्रजाती आणि कॅसिलियन हा दुर्मिळ असलेला सापासारखा प्राणीही आरे मिल्क कॉलनीच्या जंगलात आढळला आहे. या व्यतिरिक्त इथे ९० प्रजातींचे कोळी, ५ प्रजातींचे टारंटूलास आणि विंचवाच्या ६ प्रजाती सापडल्या आहेत.
(हेही वाचा – curriculum development म्हणजे काय?)
आरे मिल्क कॉलनी या भागात राहणारे लोक
आरे मिल्क कॉलनी (aarey colony) येथे जवळपास २७ आदिवासी पाडे आहेत. तसंच इतर लहान वस्त्याही आहेत. कातकरी, महादेव कोळी, मल्हार कोळी आणि वारली या इथल्या मूळ जमाती आहेत. या भागात राहणारे आदिवासी शेती करतात. वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि भाजीपाला ते पिकवतात. मग आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी बाजारपेठेत नेऊन विकतात. आरे मिल्क कॉलनीमध्ये साई, गुंडगाव, फिल्मसिटी, रॉयल पाल्म्स, दिंडोशी (एक्सर पहाड), आरे, पहाडी गोरेगाव, व्यारावळ, कोंडीविटा, मरोशी (मरोळ), परजापूर आणि पासपोली या १२ गावांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त इथल्या वसाहतींमध्ये दुग्धव्यवसायही प्रामुख्याने केला जातो. इथे वेगवेगळ्या भागांमध्ये जवळपास १६,००० एवढी गुरे पाळण्यात येतात. याव्यतिरिक्त या वसाहतीत उद्याने, रोपवाटिका, तलाव, पिकनिक सुविधाही आहेत. छोटा काश्मीर हा इथला लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community