Bandra worli sea link का आहे इतकं प्रसिद्ध?

244
Bandra worli sea link का आहे इतकं प्रसिद्ध?

वांद्रे-वरळी सी लिंक (Bandra worli sea link) हा ५.६ किलोमीटर लांबीचा आणि ८ लेन रुंद असलेला केबल-स्टेड पूल आहे. हा पूल मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या वांद्रेला दक्षिण मुंबईतल्या वरळीशी जोडतो. हा सर्वात लांब सागरी पूल आहे. तसंच हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, भूपेन हजारिका सेतू, दिबांग नदी पूल आणि महात्मा गांधी सेतू यांच्यानंतर भारतातला ५वा सर्वांत लांब पूल आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूंना प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट-स्टील वायडक्ट्स आहेत. वेस्टर्न फ्रीवेचा एक भाग म्हणून हे नियोजित केलं होतं की, हा पूल मुंबईतल्या पश्चिम उपनगरांना मुंबईच्या मुख्य बिझनेस टाऊनमधल्या नरिमन पॉइंटशी जोडेल. पण आता तो कांदिवलीच्या कोस्टल रोडचा भाग होण्याची योजना आहे.

(हेही वाचा – Imagica mumbai : मुंबईतील इमॅजिका वॉटर पार्कमध्ये करा खूप मस्ती!)

हा पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDC यांच्याद्वारे कार्यान्वित करण्यात आला आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने तो बांधला. या सी-लिंकच्या आठ लेनपैकी पहिल्या चार लेन ३० जून २००९ या दिवशी लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या. त्यानंतर इतर सर्व लेन २४ मार्च २०१० या दिवशी सुरू करण्यात आल्या होत्या. सी-लिंकमुळे (Bandra worli sea link) वांद्रे आणि वरळी दरम्यानचा प्रवासाचा वेळ वीस ते तीस मिनिटे असायचा, तो वेळ आता अर्धा झाला आहे. २०१८ सालापर्यंत बांद्रा-वरळी सी-लिंकची दररोजची वाहनांची रहदारी सरासरी ३२,३१२ एवढी होती.

इतिहास

माहिम कॉजवे हा मुंबईतल्या पश्चिम उपनगरांना मुंबईच्या मध्यवर्ती बिझनेस टाऊनला जोडणारा एकमेव रस्ता होता. पण हा रस्ता उत्तर-दक्षिण-पश्चिम दिशांनी चालणाऱ्या वाहनांमुळे जाम असायचा. इथे तासंतास ट्राफिक खोळंबून राहायचं.

म्हणूनच वेस्टर्न फ्रीवे प्रकल्प हा मुंबईच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर गर्दी कमी करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आला होता. वांद्रे-वरळी सी लिंक हा माहीम खाडीवरला या फ्रीवे प्रणालीचा पहिला टप्पा म्हणून प्रस्तावित करण्यात आला होता. यामुळे माहिम कॉजवेला पर्यायी मार्ग मिळणार होता.

(हेही वाचा – Golden Chariot या लक्झरी ट्रेनचे तिकीट भाडे किती आहे? आणि काय काय सुविधा मिळतात?)

वांद्रे-वरळी सी-लिंकची रचना

भारतातल्या खुल्या समुद्रात बांधण्यात आलेला पहिला केबल-स्टेड ब्रिज म्हणून वांद्रे-वरळी सी-लिंकची (Bandra worli sea link) रचना करण्यात आली. अंतर्निहित भूगर्भशास्त्रानुसार या पुलाच्या तारांमध्ये एक जटिल भूमिती असलेलं डिझाईन असल्याचं दिसून येतं. अभियांत्रिकी कौशल्य असलेल्या पुलाच्या सौंदर्याशी समतोल साधणं हे या प्रकल्पासमोरचं एक महत्त्वपूर्ण आव्हान होतं.

वांद्रे-वरळी सी-लिंक हा सिस्मिक अरेस्टरचा वापर केलेला मुंबईतला पहिला पायाभूत सुविधा प्रकल्प होता. त्यामुळे हा वांद्रे-वरळी सी-लिंक रिश्टर स्केलवर ७.० पर्यंतच्या भूकंपांना तोंड देण्यासाठी सक्षम आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.