deenanath mangeshkar hospital pune का आहे इतकं प्रसिद्ध आणि कोणकोणत्या सुविधा मिळतात?

87
deenanath mangeshkar hospital pune का आहे इतकं प्रसिद्ध आणि कोणकोणत्या सुविधा मिळतात?

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेलं एक चॅरिटेबल ट्रस्ट आणि मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आहे. हे रुग्णालय २००१ साली स्थापन करण्यात आलं होतं. या रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी ८०० बेड्स उपलब्ध करण्यात आले आहेत. हे रुग्णालय पुण्यातल्या सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वन-स्टॉप मेडिकल सेंटरमध्ये अत्याधुनिक पद्धतीने चाचण्यांचं निदान केलं जातं. तसंच वेगवेगळ्या रोगांवर उपचार करण्यासाठी आधुनिक सुविधा आणि इमर्जन्सी सुविधा देण्यात येतात. (deenanath mangeshkar hospital pune)

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची रचना सुंदर आहे. या रुग्णालयाला चार विंग्स आहेत. तसंच या रुग्णालयामध्ये बारा ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक ICU, रक्तपेढी, डिजिटल रेडिओलॉजी युनिट, किडनी प्रत्यारोपण युनिट आणि इतर अनेक सुविधांसह रुग्णांसाठी आठशे बेड्सची सुविधा उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त इथे रोगांचे निदान करण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी काही उत्तम उपकरणेही आहेत. (deenanath mangeshkar hospital pune)

(हेही वाचा – Arvind Kejriwal यांना सशर्त जामीन)

पुण्यातले सर्वोत्कृष्ट वैद्यकीय आणि प्रशासकीय कर्मचारी या रुग्णालयामध्ये सेवा देतात. तसंच EMS, कार्डियाक आणि ट्रॉमा ऍम्ब्युलन्स सारख्या अनेक सेवांसाठी इथले कर्मचारी सदैव तत्पर असतात. या रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या गरजांकडे खूप लक्ष दिलं जातं. हे एक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असल्यामुळे इथे कर्करोग, व्हॉईस डिसऑर्डर, कार्डिओलॉजी आणि कार्डिओथोरॅसिक शस्त्रक्रिया, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट, यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी आणि न्यूरोलॉजी अशा सेवा प्रदान केल्या जातात. (deenanath mangeshkar hospital pune)

रुग्णालयाचा मुख्य हेतू

कोणताही भेदभाव न करता सर्व रुग्णांना परवडणाऱ्या किंमतीत सर्वोच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा प्रदान करणे. तसंच चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सक्षम, नैतिक, सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करणे. (deenanath mangeshkar hospital pune)

रुग्णालयाची मूळ मूल्ये
  • रुग्णाची उत्तम काळजी
  • तर्कशुद्ध आणि नैतिक वैद्यकीय उपचार
  • समग्र दृष्टीकोन
  • सेवाभाव

(हेही वाचा – ICC Test Championship : अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला उर्वरित १० पैकी ‘इतक्या’ कसोटी जिंकाव्याच लागतील)

रुग्णालयाचं गुणवत्ता धोरण

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उत्कृष्ट वैद्यकीय उपचार दिले जातात. तसंच तर्कसंगत आणि नैतिक वैद्यकीय पद्धतींचं पालन केलं जातं. इथले सगळे कर्मचारी वैद्यकीय-सामाजिक सेवांसाठी वचनबद्ध आहेत.

रुग्णालयाचं गुणवत्ता उद्दिष्ट

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैद्यकीय केंद्र बनवण्यासाठी इथलं व्यवस्थापन एक टीम म्हणून प्रामाणिकपणे काम करतं. तसंच वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत इथे गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव केला जात नाही. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये २४ तास इमर्जन्सी सुविधा, चार प्रकारचे अतिदक्षता युनिट्स (प्रौढ, बालरोग, ह्रदय आणि नवजात आयसीयू) आणि रिहॅब केंद्रही आहे.

वैद्यकीय सुविधांमध्ये एक कार्डियाक कॅथेटेरायझेशन लॅब, १२ ऑपरेटिंग थिएटर (दोन विशेषत: ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी), एक सर्जिकल नेव्हिगेशन सिस्टम, एंडोस्कोपी, आर्थ्रोस्कोपी, लिथोट्रिप्सी आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी क्षमता असलेले विभाग आहेत. याव्यतिरिक्त डायग्नोस्टिक इमेजिंग, ३ टेस्ला एमआरआय, ६४ स्लाइस सीटी स्कॅनिंग, पोर्टेबल सीटी यांसारख्या सुविधा आहेत. (deenanath mangeshkar hospital pune)

(हेही वाचा – Virat & Rohit : भारतीय संघात विराट आणि रोहितची जागा कोण घेणार?)

पीएसीएस डिजिटल इमेजिंग व्यवस्थापन
  • रेडिएशन थेरपी
  • सीमेन्स लिनियर एक्सलेटर
  • सीटी सिम्युलेटर

तसंच रोगनिदानाची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी रुग्णांच्या रेडिएशन पूर्व तयारीसाठी सिम्युलेटर टोपोमेट्रिक उपकरण, सीटी आणि एमआरआय इमेजिंग सिस्टमशी थेट कनेक्शन असलेली ३-डी संगणक नियोजन प्रणाली, यांचा समावेश आहे. या रुग्णालयामध्ये रुग्णांना त्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत सर्वोत्कृष्ट उपचार दिले जातात. (deenanath mangeshkar hospital pune)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.