दोन दिवस पावसाच्या हलक्या सुरु असल्या तरीही मुंबईतला उकाडा आणि उन्हाच्या झळा कमी झालेल्या नाहीयेत. शनिवारी पाऊस मुंबईतून गायब असला तरीही सकाळी सुरु असलेला उकाडा कायम राहिलाय. त्यात कमाल तापमानात घट होत नाहीये. यावर मुंबईच्या किना-यावर दाखल होणा-या खा-या वा-यांकडे वेधशाळेनं बोट दाखवलंय.
ऑक्टोबर हीट सरत असताना मध्येच मुंबईतील कमाल तापमान ३६ तर काही दिवसांपूर्वीच किमान तापमानही २६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. आता किमान तापमान दोन अंशाने तर कमाल तापमान ३५ अंशावर खाली उतरलंय. मात्र नोव्हेंबर महिना लक्षात घेता ही तापमानवाढ जास्तच असल्याची नोंद होतंय. शनिवारीही कमाल तापमान ३५.७ अंश सेल्सिअसवर तर किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद झालीय. सोमवारपर्यंत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर राहील, तर किमान तापमान रविवारी २५ तर सोमवारी २४ अंश सेल्सिअसवर राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं दिलाय.
खा-या वा-यांची भूमिका
किनारपट्टीवरील कमाल तापमान नियंत्रणात राहण्यासाठी समुद्रावरुन वाहणारे खारे वारे महत्त्वाचे ठरतात. खारे वारे दुपारी बाराच्या सुमारास किनारपट्टीवर पोहोचले तरच कमाल तापमान नियंत्रणात राहतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून खारे वारे विलंबाने किनारपट्टीवर दाखल होताहेत.
Join Our WhatsApp Communityमुंबईत खारे वारे उशिराने दाखल होताहेत. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होतेय.के.एस.होसाळीकर, शास्त्रज्ञ-जी, विभागप्रमुख- एसआयडी, वातावरण संशोधन आणि सेवा, भारतीय हवामान खाते, पुणे