soho house ची स्थापना १९९५ मध्ये झाली. जेव्हा संस्थापक निक जोन्स यांनी लंडनच्या ग्रीक रस्त्यावर त्यांचे रेस्टॉरंट कॅफे बोहेमच्या वर पहिले सोहो हाऊस उघडले. सोहो हाऊस हे नाव देण्यात आले कारण ते सोहो येथील जॉर्जियन हाऊसमध्ये होते. हॉटेलचा लोगो त्या पहिल्या जागेची आठवण करुन देतो. (soho house mumbai)
(हेही वाचा – सामाजिक आणि राजकीय समीकरणांचा समतोल साधणारा चेहरा म्हणजे Devendra Fadnavis)
आज हे हॉटेल जगभरात पसरलेले आहे. याचे वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन लोकांना साद घालते. लोकांना प्रत्येक वेळी भेट देताना एक अनोखा पण परिचित अनुभव मिळतो. येथे ड्रिंकसाठी, जेवणासाठी, आराम करण्यासाठी, काम करण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठी ऐसपैस जागा आहेत. इथे स्क्रिनिंग रूम असूननवीन आणि क्लासिक चित्रपटे दाखवली जातात. soho house मुंबई म्हणजे जुहू बीचवर असलेलं स्टायलिश क्लब आणि हॉटेल आहे. १६ जुहू तारा रोड, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४००४९ येथे हे हॉटेल स्थित आहे. बुकिंगसाठी तुम्ही ०२२ ६२१३ ३३३३ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. (soho house mumbai)
(हेही वाचा – Devendra Fadnavis हे शरद पवारांचा रेकॉर्ड मोडणार?)
या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे याचे डिझाइन. लोकल ऍंटिक्स आणि फॅब्रिक्ससह हे मुंबईपासून प्रेरित असून तसेच डिझाइन करुन ३८ बेडरूम्स तयार करण्यात आले आहे. येथे दोन रेस्टॉरंट्स आहेत- सेकोनीस मुंबई (उत्तर इटालियन पाककृती) आणि द एलिस (थाई-प्रेरित पदार्थ). तसेच जिम, रूफटॉप पूल, ३२-सीट स्क्रीनिंग रूम, लायब्ररी आणि कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध आहे. रु. ४२,५०० (तिमाही) पासून (२७ वर्षांखालील सदस्यांसाठी रु. २१,२५०) सदस्यत्व सुरु होते. येथील इंटीरियरमध्ये स्थानिक पातळीवर तयार केलेले फर्निचर आणि भारतीय पुरातन वस्तू आहेत. रुफटॉप पूल आणि बार असल्यामुळे आराम करण्यासाठी ही आदर्श जागा आहे. तसेच इथे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. (soho house mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community