आयुर्वेदानुसार जाणून घ्या तुमची प्रकृती!

127

आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ हे तीन प्रमुख शरीराची वैशिष्ट्ये उपचारांत ग्राह्य धरली जातात. या उपाययोजनेत तुमच्या शरीराला वाताचा, पित्ताचा किंवा कफाचा त्रास आहे का हे जाणून घ्यायला हवं. लहान वयात मूल सर्दी, खोकल्याने हैराण राहतं त्यानंतर वाढत्या वयात वेळेवर अन्न न खाण्याची सवय असल्यास पित्ताचा त्रास प्रामुख्याने तरुणांमध्ये जाणवतो. तिशीजवळ येताच शरीरात वाताची समस्या दिसून येते. मात्र शरीराची नेमकी प्रकृती ही तिशीच्या जवळपास आल्यानंतरच समजते, असे आयुर्वेदाचार्य सांगतात.

तुमच्या स्वभावासह सवयींनुसार जाणून घ्या तुमची प्रकृती

शरीराचे वजन

  • वाताच्या रुग्णांचे वजन सहसा पटकन वाढत नाही. ते अपेक्षित वजनाच्या जवळपास असतात
  • पित्ताच्या प्रकृतीच्या माणसांचे वजन सहज वाढते आणि कमीही होते
  • कफ प्रकृतीची माणसांचे वजन जरा जास्तच असते, सहसा वजन घटतही नाही

केस 

  • (वात) केस रुक्ष दिसून येतात. केस घनदाट काळे तर कित्येकदा चॉकलेटी रंगाचे केस आढळून येतात
  • (पित्त) पित्ताच्या माणसांचे केस सरळ, तेलकट आणि पातळ दिसून येतात. केसांच्या गळतीची समस्या आढळते.
  • (कफ) काळे रंग, कुरळे केस, केसांमध्ये घनता जास्त दिसून येते.

त्वचा 

  • (वात) रुक्ष त्वचा, पातळ आणि थंड त्वचा
  • (पित्त) त्वचा कोमल, तजेलदार मात्र मुरुमे असतात.
  • (कफ) कफ प्रकृतीची माणसांची त्वचा तेलकट, जाडसर आणि मऊ असते.

खाण्याच्या सवयी 

  • (वात) पदार्थ तोंडात गेल्यानंतर लगेचच गिळण्याची सवय वाताच्या रुग्णांमध्ये दिसून येते. कधीही आणि अवेळी जेवण खातात. गोड, आंबट आणि मिठाचे योग्य प्रमाण असलेले पदार्थ पसंत असतात.
  • (पित्त) – खाण्याच्या सवयी संथ गतीने दिसून येतात. अचानक भूक लागते. गोड, कडू आणि झणझणीत जेवण आवडते.
  • (कफ) – जेवण व्यवस्थिपणे खाण्याकडे कफप्रकृतीच्या माणसांचा कल आढळतो. कोणत्याही वेळेचे जेवण ही माणसे आरामात टाळू शकतात. कडू आणि झणझणीत जेवण आवडते.

शरीराचे तापमान 

  • (वात) – सामान्यपेक्षाही शरिरीचे तापमान कमी असते. हात आणि पाय थंड असतात.
  • (पित्त) – शरीराचे तापमान सामान्यतेपेक्षाही जास्त आढळते. चेहरा आणि डोक्यावर हात लावल्यास तापमान जास्त जाणवते.
  • (कफ) शरीराचे तापमान सामान्य असते परंतु हात आणि पायाचे तापमान थंड असते.

या ऋतुमानात त्रास होतो 

  • (वात)- हिवाळा
  • (पित्त) – उन्हाळा
  • (कफ) – दमट, थंड आणि पावसाळी वातावरण

स्मरणशक्ती 

  • (वात) स्मरणशक्ती कमजोर असते. एखादी गोष्ट किंवा परिस्थिती पटकन समजून घेतात.
  • (पित्त) स्मरणशक्ती खूप चांगली असते.
  • (कफ) गोष्ट, माणसे कायमस्वरुपी लक्षात राहतात. मात्र त्यांना पटकन परिस्थिती समजत नाही.

झोपेच्या वेळा 

  • (वात) कमी आणि अपुरी झोप असते
  • (पित्त) पित्त प्रकृतीची माणसे कमी झोप घेतात परंतु कमी तासांच्या झोपेतही गाढ झोपेत असतात
  • (कफ) पुरेशी आणि व्यवस्थित झोप घेतात

स्वभाव 

  • (वात) जास्त लहरी स्वभाव असतो. भित्री प्रवृत्ती असते.
  • (पित्त)- स्वभावात हळूहळू बदल दिसून येतात. धीट आणि अहंकारी
  • (कफ) स्थिर स्वभाव, माफ करा आणि विसरुन जा ही प्रवृत्ती असते.

आर्थिक नियोजन 

  • (वात) पैसा हवा तसा खर्च करतात
  • (पित्त) गरजेच्या गोष्टींवर पैसा खर्च करतात
  • (कफ) गुंतवणूकीकडे प्राधान्य असते

शारिरीक ऊर्जा 

  • (वात) थोड्या कामानंतर लगेचच थकवा येतो.
  • (पित्त) पित्त प्रकृतीच्या माणसांनाही कामात शेवटपर्यंत उर्जा टिकवता येत नाही. वात प्रकृतीच्या माणसांच्या तुलनेत ते पटकन थकत नाही
  • (कफ) सहसा पटकन थकत नाही
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.