सिंधुदुर्गात रंगणार कोकण चित्रपट महोत्सव!

101

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ ते ७ मे या कालावधीत पहिल्यांदाच कोकण चित्रपट महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना वाव देण्याबरोबरच येथील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आहे अशी घोषणा चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते विजय पाटकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी अमोल चौगुले, अवी सामंत, विजय राणे, यश सुर्वे, हार्दिक शिगले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते.

कोकणातील कलाकारांची ओळख

या महोत्सवाच्या अंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यात निवडक १० चित्रपट दाखवण्यात येतील. त्यातील प्रथम तीन क्रमांकाच्या चित्रपटांचा मानांकन देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे पाटकर म्हणाले. या महोत्सवाचा महत्त्वाचा फायदा जिल्हा पर्यटन आणि स्थानिक कलाकारांना होईल. खरेतर कोकण ही कलारत्नाची खाण असून भारतीय आणि मराठी चित्रपट सत्तेतील ५५ टक्के कलाकार हे मूळ कोकणातील आहेत. मात्र, हे कोकणवासीयांना माहीत नाही. त्यामुळे या महोत्सवाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कोकणातील कलाकारांची ओळख करून दिली जाणार आहे. तर स्थानिक कलाकारांना या क्षेत्रात प्राधान्याने आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील कलाकारांना होईल, असा विश्वास अभिनेते विजय पाटकर यांनी व्यक्त केला.

( हेही वाचा : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये भाडेतत्वावर रुग्णवाहिकांची सेवा! )

या महोत्सवात कोकणात शुटिंग झालेल्या फिल्म दाखविण्यात येतील. एक चित्रपट निर्मिती झाली तर सुमारे ४०० लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. असेही पाटकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.