Korigad Fort : कोरीगड किल्ला हा ट्रेकिंगसाठी त्रासदायक आहे का? कसे पोहोचाल या किल्ल्यावर?

34
Korigad Fort : कोरीगड किल्ला हा ट्रेकिंगसाठी त्रासदायक आहे का? कसे पोहोचाल या किल्ल्यावर?
Korigad Fort : कोरीगड किल्ला हा ट्रेकिंगसाठी त्रासदायक आहे का? कसे पोहोचाल या किल्ल्यावर?
कोरीगड किल्ला ट्रेक: परिचय

कोरीगड किल्ला (Korigad Fort) हा महाराष्ट्रातला एक किल्ला आहे. ट्रेकिंगची सुरूवात करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्वात योग्य ट्रेकपैकी एक ठिकाण आहे. कोरीगड हा असा एक सहज आणि सोपा ट्रेक आहे, जो आपल्या आसपासच्या निसर्गाचं मनोरम्य दर्शन घडवतो.

या किल्ल्यावर पावसाळ्यामध्ये पायऱ्यांसारखे धबधबे दिसतात, तसंच हंगामी रिव्हर्स वॉटर फॉल्स (Reverse Water Falls) आणि किल्ल्याच्या वर असलेल्या विस्तीर्ण पठारासाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर तुम्ही हिवाळ्यातही तळ ठोकू शकता.

किल्ल्याभोवतीच्या संपूर्ण परिसराचं दृश्य पाहण्यासाठी तुम्ही किल्ल्याच्या संपूर्ण २ किलोमीटर परिघाचा प्रवास पायी करू शकता.

(हेही वाचा – हिंदूंना धोक्याची जाणीव करून देण्यासाठी ग्राहक जागृती अभियान – मंजिरी मराठे Om Certificate)

कोरीगड किल्ल्याची काही तथ्ये
  • १६५७ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी कोरीगड आणि इतर अनेक किल्ले जिंकले. या किल्ल्यावर सहा तोफा आहेत. इथल्या सर्वात मोठ्या तोफेला “लक्ष्मी तोफ” म्हणतात.
  • कोरीगड किल्ल्यावर (Korigad Fort) तीन मंदिरं आहेत. या तीनही मंदिरांत स्वतंत्रपणे कोराई देवी, श्रीहरी विष्णू आणि महादेवाची पूजा केली जाते.
  1. कोरीगड ट्रेकची चढण – सोपी
  2. आसपासचा प्रदेश – लोणावळा
  3. सर्वोत्तम ऋतू – पावसाळा
  4. कोरीगड किल्ल्याची उंची – सुमारे ३००० फूट.
  5. कोरीगड किल्ल्यावर कसं पोहोचायचं?

कोरीगड किल्ला (Korigad Fort) हा लोणावळा शहरापासून सुमारे २० किलोमीटर एवढ्या अंतरावर असल्याने तुम्ही सार्वजनिक किंवा खाजगी वाहनाने किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता.

कोरीगड किल्ल्याचा (Korigad Fort) ट्रेक कोणत्याही बेस व्हिलेजपासून सुरू होत नाही. ट्रेकचा सुरुवातीचा पॉईंट आंबी दरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून आहे.

(हेही वाचा – Hindu : हिंदू ग्राहक जागृती अभियानाचा शुभारंभ; हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी-विक्री व्यवहार ठेवायला हवा; डाॅ. सच्चिदानंद शेवडे यांचे आवाहन )

खाजगी वाहनाने
  • मुंबईपासून कोरीगडपर्यंत अंतर सुमारे १०० किलोमीटर एवढं आहे. याव्यतिरिक्त टोल नाक्यांवरचे ब्रेक आणि ट्रॅफिक जाम लक्षात घेता कोरीगडपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे अडीच ते तीन तास लागू शकतात.
  • पुण्यापासून कोरीगडपर्यंतचं अंतर सुमारे ८५ किलोमीटर एवढं आहे. त्यामुळे पुण्याहून कोरीगडपर्यंत पोहोचण्यासाठी दोन ते अडीच तास लागू शकतात.
सार्वजनिक वाहतुकीने

मुंबई किंवा पुण्याहून लोणावळा येथे स्थानिक एमएसआरटीसी (MSRTC) च्या बसने पोहोचता येतं. या बसने लोणावळा (Lonavala) येथे पोहोचण्यासाठी सुमारे तीन ते चार तास लागतात.

याव्यतिरिक्त मुंबई किंवा पुण्याहून लोणावळ्याला (Lonavala) ट्रेननेही जाता येतं. या मार्गावरचा रेल्वे प्रवास पावसाळ्यात एक अद्भूत अनुभव देतो.

लोणावळ्याला (Lonavala) पोहोचल्यानंतर मुख्य बाजारपेठेतून रिक्षा भाड्याने घेता येते. रिक्षा ड्रायव्हरला ट्रेकच्या सुरुवातीच्या ठिकाणी किंवा आंबी दरीच्या रस्त्यावर सोडायला सांगू शकता.

ट्रेकचा मार्ग आणि चढण

कोरीगडचा ट्रेक रस्त्यापासून सरळ सुरू होतो आणि एका लहान चढाईने पायवाटेवर घेऊन जातो. एका दिशेने हा प्रवास सुमारे दीड ते दोन किलोमीटर एवढा आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारणपणे एक तास एवढा वेळ लागतो.

सुरुवातीला ५ मिनिटांची चढाई केल्यानंतर हा मार्ग दगड आणि खड्यांचा बनलेला एक ऑफ-रोड आहे. इथे चालण्यासाठी आणखी २० मिनिटं लागतात. त्यानंतर लागणारा पायऱ्यांकडे जाणारा मार्ग, हा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाणाऱ्या मार्गाचा शेवटचा टप्पा आहे.

तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला एक विस्तीर्ण तलाव दिसेल. पावसाळ्यात गेलात तर धुकंही दिसेल. तिथे एक स्थानिक गावकरी चहा आणि नाश्ता विकतो. ट्रेक पूर्ण केल्यानंतर त्याचा आनंद घेऊ शकता.

पावसाळ्यात जर कोरीगड येथे गेलात तर मुसळधार पावसामध्ये किल्ल्याच्या एका बाजूला तुम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल्स दिसेल. हा धबधबा पाहण्याच्या आनंद स्वर्गसुखापेक्षा कमी नसतो. त्यानंतर तुम्ही किल्ल्याच्या संपूर्ण तटाभोवती फिरू शकता किंवा तलावाजवळ आरामही करू शकता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.