Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँक कुठल्या बँकिंग सेवा देते?

Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा ही देशातील एक मोठी खाजगी वित्तीय संस्था आहे 

116
Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँक कुठल्या बँकिंग सेवा देते?
Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँक कुठल्या बँकिंग सेवा देते?
  • ऋजुता लुकतुके 

१९८५ मध्ये उदय कोटक या बँक अधिकाऱ्याच्या मुलाने महिंद्रा समुहाची मदत घेऊन एक खाजगी बँक सुरू केली. त्यानंतर काही वर्षांनी आयएनजी वैश्य बँक या बँकेत विलीन करून आपल्या बँकिंग सेवेचा विस्तारही केला. वेळेवर धाडसी निर्णय घेऊन आणि ते तडीस नेऊन उदय कोटक या जैन तरुणाने कोटक महिंद्रा बँकेला देशातील एक महत्त्वाची वित्तीय संस्था आणि बँक म्हणून नावारुपाला आणलं आहे. शेअर बाजारातील भाग भांडवलाच्या निकषावर सध्या ही देशातील तिसरी मोठी बँक आहे. ही बँक देत असलेल्या सेवा समजून घेऊया, (Kotak Mahindra Bank)

(हेही वाचा- Mumbai Water Supply : मुंबईमधील ‘वडाळा,शीव आदी भागात अपुरा आणि दूषित पाण्याचा पुरवठा)

मुंबईत मुख्यालय असलेल्या या बँकेच्या देशभरात १,५०० शाखा असून २,३५० एटीएम केंद्र आहेत. कोटक महिंद्रा ही संस्था विविध बँकिंग सेवांबरोबरच वित्तीय सेवा, जनरल इन्श्युरन्स, आयुर्विमा आणि मालमत्ता व्यवस्थापन अशा सेवाही देते. (Kotak Mahindra Bank)

बँकिंग सेवांमध्ये कोटक महिंद्रा बँकेत तुम्हाला नियमित बचत खातं तसंच व्यावसायिकांसाठी चालू खातं उघडण्याचीही सोय आहे. बचत खात्यावर ग्राहकांना व्याजही मिळतं. त्याचबरोबर ग्राहकांना गुंतवणुकीसाठी विविध प्रकारच्या मुदतठेवींमध्येही पैसे गुंतवता येतात. त्यावर ठरावीक व्याजदराने बँक व्याज देते. अलीकडच्या काळात नेट बँकिंगची सुविधाही ही बँक देते. आणि त्याचबरोबर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड सेवाही बँकेकडून देण्यात येते. (Kotak Mahindra Bank)

(हेही वाचा- Election Commission: काँग्रेसचे ‘ते’ आरोप तथ्यहिन, बेजबाबदार! निवडणूक आयोगाने फटकारलं)

कर्जाच्या बाबतीत गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, सुवर्ण तारण कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, अशी कर्जही बँक देते. आणि अलीकडच्या काळात कंपनीने मालमत्ता व्यावस्थापन कंपनीही सुरू केली आहे. त्या मार्फत आता डीमॅट खातंही या बँकेत तुम्हाला सुरू करता येतं. त्या मार्फत शेअर बाजारात खरेदी विक्री तसंच म्युच्युअल फंडात खरेदी विक्री करता येते. (Kotak Mahindra Bank)

याशिवाय वित्तीय कंपन्यांचा ताफाही उदय कोटक यांनी वाढवला आहे. कोटक साम्राज्यात आता महिंद्रा फायनान्स लिमिटेड, कोटत अर्टरनेट असेट्स लिमिटेड अशा कंपन्याही उभ्या राहिल्या आहेत. तर कोटक म्युच्युअल फंडाचीही स्थापना झाली आहे. (Kotak Mahindra Bank)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.