कोथळीगड या किल्ल्याला “पेठ किल्ला” असंही म्हटलं जातं. कारण हा किल्ला पेठ नावाच्या गावात आहे.
कोथळीगड हा एक उंच किल्ला आहे. हा किल्ला मुख्यत्वे पहारा ठेवण्यासाठी आणि संरक्षण तळ म्हणून वापरला जात होता. (Kothaligad Fort)
(हेही वाचा – ram mandir railway station हे मुंबईत कुठे आहे? आणि काय आहे या स्टेशनचे वैशिष्ट्य)
कोथळीगड किल्ल्याचा इतिहास :
मराठा साम्राज्य आणि मुघल साम्राज्याच्या अंतर्गत झालेल्या एका लढाईमध्ये दुर्दैवाने हा किल्ला मुघलांकडे गेला. तरीही मराठ्यांनी किल्ला जिंकण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच ठेवले होते.
१३० वर्षांनंतर नोव्हेंबर १८१७ साली बाजीराव (दुसरे) आणि मराठा सरदार बापूराव यांनी इंग्रजांशी झालेल्या लढाईमध्ये हा कोथळीगड जिंकून घेतला. (Kothaligad Fort)
(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू)
कोथळीगडपर्यंत कसे पोहोचायचे :
कोथळीगडावर जायचं असेल तर तुम्ही किल्ल्यापर्यंत आपल्या खाजगी गाडीने प्रवास करू शकता. गुगल मॅपवर “कोथळीगड किल्ला” शोधला तर तुम्हाला याचं लोकेशन सहज सापडू शकतं.
आंबिवली गावापर्यंतचा रस्ता चांगल्या स्थितीत आहे. पण त्यानंतर रस्त्याची स्थिती खूपच बिकट आहे. त्या रस्त्यावरून जाण्यासाठी तुमच्या सोबत एक चांगला व्यावसायिक ड्रायव्हर सोबत असावा लागेल.
कोथळीगडाच्या पायथ्यापासून माथ्यावर पोहोचण्यासाठी ३० ते ४५ मिनिटे एवढा कालावधी लागतो. तसंच संपूर्ण किल्ल्यावर फिरण्यासाठी सुमारे १ तास एवढा कालावधी लागतो. (Kothaligad Fort)
जर का तुम्हाला सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला आधी मुंबईजवळच्या कर्जत रेल्वे स्टेशनवर यावं लागेल. पुणे आणि मुंबईहून कर्जतला पोहोचण्यासाठी गाड्यांची संख्या मुबलक प्रमाणात आहे. कर्जतला पोहोचल्यानंतर तुम्हाला काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एसटी स्टँडवर जावे लागेल. एसटी स्टँडवरून आंबिवलीला येणारी थेट बस तुम्ही पकडू शकता. पण इथून बसची फ्रिक्वेन्सी खूपच कमी आहे.
म्हणूनचं दुसरा पर्याय म्हणजे कशेळे येथे जाण्यासाठी बस किंवा टमटम(सहा आसनी रिक्षा) पकडणे होय. एसटी स्टँडवरून टमटम थेट आंबिवलीला जाण्यासाठी उपलब्ध आहे.
(हेही वाचा – प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर पुन्हा एकदा Stone Pelting; झाशी येथून जाणाऱ्या रेल्वेत घडली घटना)
- कर्जत ते आंबिवली पर्यंतच्या थेट बसेसची वेळ : सकाळी ८:३०, सकाळी १०:४५, दुपारी १:००, संध्याकाळी ७:३०
- अंबिवली ते कर्जत : सकाळी ६:३०, सकाळी ९:४५, सकाळी ११:३०, दुपारी १:००, दुपारी २:२०, संध्याकाळी ५:३०.
(हेही वाचा – Donations to Political Parties : राजकीय पक्षांवर देणग्यांचा वर्षाव, भाजपाच्या देणग्यांमध्ये ८७ टक्क्यांनी वाढ)
या बसेसना यायला ३० मिनिटे उशीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसारच तुम्ही नियोजन करू शकता.
आंबिवली येथून तुम्हाला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी ४ किलोमीटर एवढा चढणीचा रस्ता चालावा लागेल. त्यासाठी त्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागू शकतो. (Kothaligad Fort)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community