ladakh tourist places : लडाखमधील टॉप १० पर्यटन स्थळे! चला तर करुया सफर लडाखची

163
ladakh tourist places : लडाखमधील टॉप १० पर्यटन स्थळे! चला तर करुया सफर लडाखची

लेह लडाख हा भारतातील सर्वात सुंदर केंद्रशासित प्रदेश आहे. हा परिसर काराकोरम रेंजमधील सियाचीन ग्लेशियरपासून दक्षिणेकडील मुख्य ग्रेट हिमालयापर्यंत पसरलेला. बहुतेक लोक लेह आणि लडाखला एक ठिकाण मानतात परंतु जम्मू आणि काश्मीर राज्य तीन भागांमध्ये विभागले गेले आहे ज्यात जम्मू, काश्मीर आणि लडाखचा समावेश आहे. लडाख हे दोन भागात विभागले गेले आहे ज्यात लेह जिल्हा आणि कारगिल जिल्हा समाविष्ट आहे. (ladakh tourist places)

आकर्षक मठ, सुंदर पर्यटन स्थळे आणि भव्य बाजारपेठेमुळे लेह शहर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. कठोर भूप्रदेश, सुंदर हिमवर्षाव आणि अनेक साहसी क्रियाकलापांमुळे लेह लडाख हे भारतातील पर्यटनाच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. लडाखचे नैसर्गिक सौंदर्य डोळ्यांत भरुन ठेवण्यासारखे आहे. हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी खूप प्रसिद्ध आहे. लडाखमध्ये वसलेल्या प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे, जे विविध रंगांनी, निसर्ग सौंदर्याने आणि पर्वतांच्या मधोमध असलेल्या सुंदर दृश्यांनी भरलेले आहे. चला तर आज आपण लडाखची सैर करुया… (ladakh tourist places)

पँगॉन्ग तलाव

हा तलाव लडाखमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे सरोवर १२ किलोमीटर लांब असून ते भारत आणि तिबेट दरम्यान पसरलेले आहे. इथे अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले असल्यामुळे ही जागा खूप प्रसिद्ध झाली. त्यामुळे पर्यटक हे तलाव पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. विशेष म्हणजे या तलावाचे पाणी खारट आहे. हिवाळ्यात, हे सरोवर बर्फासारखे पूर्णपणे गोठते ज्यावर तुम्ही आरामात चालू शकता. येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे. (ladakh tourist places)

(हेही वाचा – Delhi Hit and Run: रॅपिडोच्या बाईक रायडरला सरकारी अधिकाऱ्याने २ किमीपर्यंत फरफटत नेलं आणि…)

खार्दुंग ला पास

खार्दुंग ला पास लेहपासून सुमारे ४० किमी अंतरावर आहे. हे ५,३५९ मीटर (१७,५८२ फूट) अंतरावर वसलेले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या मार्गाने चीनमध्ये युद्धसामग्रीची वाहतूकही होत होती. या रस्त्यावर आजही भारतीय लष्कराची वाहने ये-जा करताना दिसतात. खार्दुंग ला पास लडाखच्या उंच ठिकाणांच्या यादीत समाविष्ट झाल्यामुळे, तेथे ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे तेथे गेल्यावर ॲटिट्यूड सिकनेस होण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही खार्दुंग ला पास येथे जात असाल, तर ॲटिट्यूड सिकनेस टाळण्यासाठी तुमच्या सोबत औषधे जरूर बाळगा. (ladakh tourist places)

मॅग्नेटिक हिल

मॅग्नेटिक हिल हे पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे १४००० फूट उंचीवर आहे. इथे पोहोचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण तुम्ही तुमची कार न्यूटन वळणावर रस्त्यावर उभी केली तर ती सुरू न करता तुमची कार आपोआप टेकडीच्या दिशेने चढू लागेल. हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल. गंमत अशी की वाहन खालच्या दिशेने जात असतं पण ऑप्टिकल व्हिजनमुळे वाहन वरच्या दिशेने जात असल्याचा भास लोकांना होतो. (ladakh tourist places)

चादर ट्रेक

चादर ट्रेक हा लेह लडाखमधील सर्वात कठीण आणि साहसी ट्रेकपैकी एक आहे. या ट्रॅकला चादर ट्रॅक असे म्हणतात कारण हिवाळ्यात जांस्कर नदीचे बर्फाच्या पांढऱ्या आवरणात रूपांतर होते. त्यामुळे एक वेगळीच भावना आणि उत्साह तुमच्या मनात भरतो. (ladakh tourist places)

लेह पॅलेस

१७ व्या शतकात राजा सेंगगे नामग्याल याने हा राजवाडा एक भव्य राजवाडा म्हणून बांधला होता. या राजवाड्यात राजाचे संपूर्ण कुटुंब राहत होते. ही ९ मजली इमारत वास्तुकला आणि इतिहासाका पुरावा देते. इथून तुम्हाला लेहच्या मोकळ्या आकाशाचा अप्रतिम नजारा दिसतो. (ladakh tourist places)

कारगिल

कारगिल हा लडाखच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशाचा जिल्हा आहे. लडाखच्या शुरू नदीच्या खोऱ्याच्या मध्यभागी हा परिसर आहे. लेहपासून सुमारे २१५ किमी अंतरावर असून श्रीनगर पासून २०५ किमी अंतरावर स्थित आहे. तुम्ही इथे गेलात तर देशाभिमानाने तुमचे ऊर भरुन येईल. कारगिलची नोंद इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी केली आहे. कारगिल हे १९९९ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या संघर्षाचे केंद्र होते आणि भारतीय वीरांनी पाकिस्तानला इथेच पाणी पाजले होते. (ladakh tourist places)

(हेही वाचा – सरकारविरुद्ध एकत्र या; Waqf Act Amendment ला विरोध करण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा थयथयाट)

गुरुद्वारा पथर साहिब

गुरुद्वारा पाथर साहिब लेहपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. गुरुद्वारा साहिब १५१७ मध्ये गुरु नानक यांच्या स्मरणार्थ बांधले गेले. लेहचे हे तीर्थक्षेत्र म्हणजे एक अचल खडक आहे, ज्यास गुरु नानक जी यांची नेगेटिव्ह इमेज मानली जाते. अनेक ट्रक ड्रायव्हर्स आणि लष्कराच्या ताफ्यांसाठी हे ठिकाण खूप खास आहे. येथे कठीण मार्गाने प्रवास करण्यापूर्वी प्रसिद्ध गुरुद्वारा साहिबला भेट देणे शुभ मानले जाते. (ladakh tourist places)

फुगतल मठ

हे मठ लडाखमधील सर्वात प्रसिद्ध अध्यात्मिक स्थळांपैकी एक आहे जे ध्यान करण्यासाठी आणि शांत वातावरणाचा आनंद घेण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. हे ठिकाण लडाखमधील जांस्कर येथे आहे. अंदाजे २२०० वर्षे जुना हा मठ त्याच्या सौंदर्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करतो. येथे प्राचीन काळी अनेक विद्वानांचे वास्तव्य होते. (ladakh tourist places)

शांती स्तूप

हा शांती स्तूप लडाखच्या केंद्रशासित प्रदेशात असलेल्या लेह जिल्ह्यातील लेह शहरापासून फक्त ५ किमी अंतरावर आहे. या शांती स्तूपाची उंची समुद्रसपाटीपासून ११,८४० फूट आहे. म्हणूनच हा जगातील सर्वात उंच शांती स्तूप मानला जातो. हा शांती स्तूप जपानी आणि लद्दाखी बौद्ध भिक्खूंनी बौद्ध धर्माची २५०० वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ संयुक्तपणे बांधला होता. (ladakh tourist places)

हेमिस मठ

हेमिस मठ देखील लडाखमधील प्रसिद्ध ठिकाण आहे. हा मठ ११ व्या शतकापूर्वी अस्तित्वात होता आणि १६७२ मध्ये पुर्निमाण करण्यात आले. हा तिबेटी मठ आहे लडाखमधील सर्वात धनवान आणि सर्वात मोठा देखील आहे. हेमिस मठ लेह शहरापासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे. हेमिस मठामध्ये दरवर्षी भगवान पद्मसंभवांचा वार्षिक उत्सव आयोजित केला जातो. (ladakh tourist places)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.