lata mangeshkar song : लता मंगेशकर यांची कोणती १० गाणी सर्वात प्रसिद्ध आहेत?

32
lata mangeshkar song : लता मंगेशकर यांची कोणती १० गाणी सर्वात प्रसिद्ध आहेत?

लता मंगेशकर यांचा जन्म एका पारंपारिक मराठी कुटुंबात झाला होता. त्या पाच भावंडांमध्ये सर्वात मोठ्या होत्या. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे मराठी रंगभूमीचे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांना मास्टर दीनानाथ म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांना वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांचे वडील, ग्वाल्हेर घराण्याचे अमान अली खान आणि अमानत खान सारख्या उस्तादांकडून संगीताचं शिक्षण मिळालं. (lata mangeshkar song)

१९४२ साली त्यांच्या वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांनी लहान वयातच आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्यांना भारताची गानकोकिळा म्हणून गौरवलं जात. लता मंगेशकर या भारतातल्या सर्वात महान आणि प्रभावशाली गायिकांपैकी एक होत्या. त्यांच्या आठ दशकांच्या कारकिर्दीत भारतीय संगीत क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानामुळे त्यांना “क्वीन ऑफ मेलडी”, “नाइटिंगेल ऑफ इंडिया” आणि “व्हॉइस ऑफ द मिलेनियम” यांसारख्या सन्माननीय पदकांनी गौरवले गेले. लता मंगेशकर यांनी छत्तीसपेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्येही गाणी रेकॉर्ड केली. प्रामुख्याने त्यांनी हिंदी, मराठी आणि बंगाली भाषांमध्ये गाणी गायली होती. लता मंगेशकर यांना आपल्या कारकिर्दीत अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले. (lata mangeshkar song)

(हेही वाचा – tadasana benefits : शरीराला चांगला फायदा व्हावा म्हणून ताडासन कसे करावे?)

१९८९ साली भारत सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. २००१ साली देशातल्या संगीत क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानाबद्दल, त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या गायिका ठरल्या. २००७ साली फ्रान्सने त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर ऑफिसर म्हणून नियुक्त केलं होतं. (lata mangeshkar song)

याव्यतिरिक्त लता मंगेशकर यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायन पुरस्कार मिळाले होते. त्यानंतर त्यांनी पुढील पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार यासह इतर अनेक पुरस्कार घेण्याचं नाकारले होतं. १९७४ साली त्या इंग्लंडमध्ये लंडन इथल्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या पहिली भारतीय पार्श्वगायिका बनल्या. (lata mangeshkar song)

(हेही वाचा – BMC Election मधील प्रमुख मुद्दे कोणते?)

लता मंगेशकर यांची प्रसिद्ध १० गाणी
  • जब प्यार किया तो डरना क्या..
  • जिंदगी प्यार का गीत है..
  • एक प्यार का नगमा है..
  • लग जा गले..
  • तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं..
  • मेरे ख्वाबो में आए..
  • आज फिर जीने की तमन्ना है..
  • ऐ मेरे वतन के लोगों..
  • दिल तो पागल है..
  • भीगी भीगी रातों में…

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.