भारतीय वंशांचे लक्ष्मण नरसिंहन हे स्टारबक्स कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पहाणार आहेत. लक्ष्मण नरसिंहन हे पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत सध्या नरसिंहन आरोग्य आणि स्वच्छता कंपनी रेकिटचे प्रमुख असून, ऑक्टोबरमध्ये ते स्टारबक्समध्ये सहभागी होतील. एप्रिल २०२३ मध्ये सध्याचे सीईओ हॉवर्ड शल्ट्झ यांनी पदभार सोडल्यानंतर नरसिंहन पदभार सांभाळणार आहेत. त्यामुळे आता नरसिंहन हे भारतीय वंशाच्या सीईओंच्या यादीत सामील झाले आहेत.
( हेही वाचा : Zomato Project : आता दुसऱ्या शहरांमधून मागवता येतील पदार्थ; झोमॅटोने खाद्यप्रेमींसाठी लॉंच केला ‘इंटरसिटी लीजेंड’ प्रकल्प)
जगभरात भारतीयांचा डंका
सध्या अनेक जागतिक कंपन्यांची धुरा भारतीय वंशांचे दिग्गज सांभाळत आहेत. विविध कंपन्यांच्या सीईओच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, अल्फाबेटचे सुंदर पिचाई, अॅडोबचे शंतनू नारायण, डेलॉइटचे पुनीत रंजन आणि फेडएक्सचे राज सुब्रमण्यम यांचा समावेश आहे.
स्टारबक्सचे पुढचे सीईओ नरसिंहन यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण लॉडर इन्स्टिट्यूटमधून पूर्ण करत जर्मन आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
Join Our WhatsApp Community