prithvi theatre चा रोमांचक इतिहास जाणून घ्या!

52
prithvi theatre चा रोमांचक इतिहास जाणून घ्या!

पृथ्वी थिएटर (prithvi theatre) हे मुंबईतल्या जुहूसारख्या उच्चस्तरीय भागामध्ये असलेलं एक थिएटर आहे. पृथ्वीराज थिएटर कंपनी ही प्रसिद्ध अभिनेते शशी कपूर आणि त्यांच्या पत्नी जेनिफर यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांच्या स्मरणार्थ १९४४ साली स्थापन केली. पुढे सोळा वर्षे त्यांनी ही कंपनी चालवली. आर्किटेक्ट वेद सेगन यांनी या थिएटरचं डिझाईन केलं केलं होतं. हे थिएटर १९७८ साली सुरू करण्यात आलं होतं. या थिएटर आणि ऑफिसचं व्यवस्थापन जेनिफर कपूर या आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत सांभाळत होत्या.

पृथ्वी थिएटरमध्ये (prithvi theatre) दररोज वेगवेगळे कार्यक्रम होतात. तसंच मुलांसाठी कार्यशाळा आणि नाटकांचा ऍन्युअल समर कॅम्प, मेमोरियल कॉन्सर्ट, ऍन्युअल थिएटर फेस्टिव्हल यांसारखेच काव्यवाचन आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा आणि डॉक्युमेंटरी यांचा प्रचार करणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. पण सोमवारी या थिएटरमध्ये कोणतेही कार्यक्रम होत नाहीत. सोमवारच्या दिवशी सुट्टी असते.

(हेही वाचा – Maharashtra TET 2024 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024′ अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर)

पृथ्वी थिएटरचा इतिहास

१९४२ साली पृथ्वी थिएटरची (prithvi theatre) स्थापना पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या १५० साथीदारांसोबत एक ट्रॅव्हलिंग ट्रुप म्हणून केली होती. या ट्रॅव्हलिंग ट्रुपने भारतभर नाटके सादर केली होती. “शकुंतला” हे त्यांचं पाहिलं नाटक होतं. त्यानंतर या ट्रुपने “दीवार”, “पठाण”, “गद्दार”, “आहुती”, “कलाकार” यांसारखी २,६०० पेक्षा जास्त नाटके सादर केली. त्यांपैकी “कलाकार, “पैसा” आणि “किसान” या नाटकांमध्ये पृथ्वीराज यांनी प्रत्येक शोच्या वेळी मुख्य अभिनेता म्हणून काम केलं होतं.

भारतीय चित्रपट उद्योगातल्या त्यांच्या कामगिरीमुळे कंपनीच्या कार्याला निधी मिळाला. आपल्या थिएटर कंपनीला कायमस्वरूपी जागा मिळायला हवी हे पृथ्वीराज कपूर यांचं स्वप्न होतं. १९६२ साली त्यांनी जुहू येथे एक प्लॉट भाड्याने घेतला त्या भूखंडावर त्यांनी थिएटरची जागा तयार केली. १९७२ साली दुर्दैवाने त्यांची तब्येत खालावली. त्यानंतर ते देवाघरी गेले. त्यामुळे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यास उशीर झाला. ज्या वर्षी ते गेले त्याच वर्षी थिएटरच्या जमिनीची भाडेपट्टी संपली.

(हेही वाचा – बारीक गोष्‍टींकडे देखील लक्ष द्या; Acidity पासून आराम आणि उत्तम झोप मिळण्‍यासाठी टिप्‍स)

त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला तो प्लॉट विकत घेण्यासाठी ऑफर करण्यात आली. तेव्हा शशी कपूर आणि त्यांची पत्नी जेनिफर यांनी जमीन विकत घेऊन पृथ्वीराज यांचे स्वप्न साकार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘श्री पृथ्वीराज कपूर मेमोरियल ट्रस्ट अँड रिसर्च फाउंडेशन’ ची स्थापना केली. तसंच हिंदी थिएटर आणि परफॉर्मिंग आर्ट्सला प्रोत्साहन देण्यासाठी एक हक्काची जागा तयार केली आणि अशाप्रकारे उभं राहिलं पृथ्वी थिएटर… (prithvi theatre)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.