प्रत्येक स्त्रीला आपली त्वचा सुंदर आणि डागविरहित असावी, असे वाटते. वयानुसार, त्वचेच्या समस्या वाढत जातात. त्वचेवर मुरुमांचे डाग, सुरकुत्या यासह इतर समस्या निर्माण होतात, पण त्वचेची काळजी घेतली तर त्वचा चिरतरुण राहायला मदत होते.
चेहऱ्यावरील मुरुमं, डाग, फोड यामुळे सौंदर्य कमी होते. मुरुमं गेले तरीही डाग निघून जातातच असे नाही. डागांमुळे चेहरा काळपट दिसतो. अशा वेळी लिंबाच्या सालीचा उपयोग गुणकारी ठरतो.
(हेही वाचा – North Central Lok Sabha Constituency : भाजपच्या ‘या’ संभाव्य उमेदवाराची शक्यता )
लिंबाच्या सालीचा फेसपॅक वापरल्यास चेहरा चमकदार आणि डागविरहित दिसायला मदत होते. जाणून घेऊया, लिंबाच्या सालीचा फेसपॅक कसा तयार करायचा.
साहित्य –
लिंबाची साल, टोमॅटो, कडुलिंबाची पावडर, गव्हाचं पीठ, दही
फेसपॅक तयार करण्याची पद्धत
सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात २ लिंबाच्या साली, अर्धा चिरलेला टोमॅटो, १ चमचा कडुलिंबाच्या पानांची पावडर, १ चमचा गव्हाचं पीठ आणि १ चमचा दही घालून पेस्ट तयार करा. अशा पद्धतीने तयार केलेल्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील डाग दूर व्हायला मदत होईल.
चेहऱ्याला लावण्याची पद्धत
चेहरा सर्वप्रथम धुवून घ्या. त्यानंतर चमच्याने किंवा हलक्या हाताने ही पेस्ट चेहऱ्याला लावा. २० मिनिटांनंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील मुरमांचे डाग, डार्क सर्कल आणि पिग्मेण्टेशनचे डाग दूर होतील.
टीप – कोणतेही सौंदर्योपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community