या उन्हाळ्यात लिंबू पाणी विसरा!

128

महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता उन्हाच्या तीव्र झळ्या सोसणा-या नागरिकांना लिंबूपाणीही पिणे कठीण झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मागणी वाढल्याने लिंबांचे दर वाढतात. मात्र, यंदा लिंबांच्या दरांनी प्रतिकिलो १०० ते १५० रुपये इतकी विक्रमी पातळी गाठली आहे. विशेष म्हणजे केवळ मागणी वाढल्याने नव्हे तर घटत्या उत्पन्नामुळे दरात वाढ झाली आहे. या दरवाढीचा लाभ किरकोळ विक्रेते उचलत आहेत. किरकोळ विक्रेते लिंबू, स्थानिक बाजारात २०० ते २५० रुपये किलोने विकत आहेत.

( हेही वाचा : आधी पैसे द्या, मग वीज घ्या! गुजरातच्या कंपनीचा महावितरणाला झटका )

लिंबाचे उत्पादन घटले

दरवर्षी उन्हाळा येताच लिंबांना मागणी वाढते. उन्हाळा वगळता इतर काळात लिंबांना कमी दर मिळतो. गेली दोन वर्षे कोरोनामुळे लिंबांना कमी मागणी होती. त्यामुळे शेतकऱ्यांना लिंबू बागांची देखभाल करण्यासाठी उत्पन्न मिळाले नाही. तसेच यंदा काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने बागा फुलल्याच नाहीत. परिणामी यंदा लिंबाचे उत्पादन घटले

लिंबाचे फायदे

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी लिंबाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पचनसंस्था सुरळित राखण्यास मदत होते. लिंबू शरीराची कार्ये टिकवून ठेवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्तीचे नियमन करण्यास मदत करते. लिंबू हा पचन क्रिया मजबूत करणारा रस तयार करतो. तसेच, लिंबाने रक्त शुद्ध होते, लिंबू कोलेरा आणि मलेरिया दरम्यान उपचार म्हणून वापरला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.